रस्त्यावर अथवा इतर कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी आपल्याला अनेक वेळा जेसीबी दिसतो आणि जेव्हा हा जेसीबी दिसतो तेव्हा अनेकजन काही क्षण त्याच्याकडेच बघत असतात. पण आपण कधी विचार केला आहे का, की प्रत्येक जेसीबीचा रंग एक सारखाच का असतो? म्हणजेच, तो पिवळाच का असतो? आपण इतर काही मशीन्स बघितले तर आपल्याला लक्षात येईल की, त्यांत वेगवेगळे रंगही असतात. पण जेसीबी फक्त पिवळ्याच रंगात का असतो?
खरे तर, जेसीबीचा रंग आधीपासूनच पिवळा आहे, असे नाही. एके काळी त्याचा रंग लाल आणि पांढराही असायचा. मात्र, जेसीबी बनवणाऱ्या कंपनीने त्यात बदल केला आणि संपूर्ण जेसीबीला पिवळा रंग देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सर्वच जेसीबींचा रंग सारखाच असतो, म्हणजेच पिवळा असतो. तर आता प्रश्न असा, की पिवळाच का... लाल, निळा किंवा हिरवा का नाही?
जेसीबीचा पिवळा रंग असण्यामागे एक विशेष कारण आहे. जेव्हा हे लाल आणि पांढऱ्या रंगाचे असायचे, तेव्हा कंस्ट्रक्शन साइटवर ते दूरून अथवा उंचावरून व्यवस्थित दिसायला त्रास व्हायचा. रात्रीच्या वेळी तर हे मशील बिल्कुलच दिसत नव्हते. यामुळे जेसीबी तयार करणाऱ्या कंपनीने याचा रंग बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर कंपनीने जेसीबीसाठी पिवळा रंग निवडला आणि तेव्हापासून सर्व जेसीबी याच रंगात दिसून येते.
जेसीबी कंपनीचे नाव, मशीनचे नाही! - आपण ज्या मशीनला जेसीबी म्हणता, त्या मशीनचे नाव जेसीबी नाही, ते हे मशीन तयार करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. हे मशीन भारतातून जवळपास 110 देशांमध्ये निर्यात केले जाते. या मशीनची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मालकाचे आणि संस्थापकाचे नाव जोसेफ सिरिल बामफोर्ड असे आहे. त्याच्या नावाचा शॉर्ट फॉर्म जेसीबी असा होतो. या नावावरूनच कंपनीचे नावही जेसीबी असे ठेवण्यात आले आहे. बॅमफोर्डने 1945 मध्ये या कंपनीची स्थापना केली.
जेसीबी संपूर्ण जगात जवळपास 300 प्रकारच्या मशिनरी तयार करते. या कंपनीच्या व्यापार जवळपास 150 देशांमध्ये पसरलेला आहे. माहितीनुसार, जवळपास 22 देशांमध्ये याकंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. महत्वाचे म्हणजे, जीसीबी हे नाव एवढे प्रसिद्ध झाले आहे, की ब्रिटनच्या प्रसिद्ध ऑक्सफोर्ड डिक्शनरीनेही हे नाव आपल्या शब्दकोशात ट्रेड मार्कच्या स्वरुपात सामील केले आहे.