नवी दिल्ली - भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हटलं जातं. दररोज लाखो प्रवाशी रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तुम्हीही कधी ना कधी ट्रेनमधून प्रवास केला असेलच. पण रात्रीचा प्रवास करताना वेळेबाबत तुम्हाला एक प्रश्न पडलाय का? जर हा, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ट्रेन दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त वेगाने धावते. दिवसापेक्षा रात्री ट्रेनचा वेग अधिक असण्याचे कारण काय आहे? जर तुम्हाला याचे उत्तर माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
'या' कारणांमुळे रात्री ट्रेनचा वेग जास्त असतोवास्तविक, रात्रीच्या वेळी ट्रेनचा वेग अनेक कारणांमुळे वाढतो. याचे पहिले कारण म्हणजे दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकवर माणसांची आणि प्राण्यांची ये-जा कमी होते. तसेच रात्रीच्या वेळी रेल्वे रुळावर कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्तीची कामे होत नसल्याने यावेळी रेल्वे जास्त वेगाने धावते.
दूरून सिग्नल स्पष्ट दिसतातयाशिवाय, हे देखील एक कारण आहे की, ट्रेनचा चालक म्हणजेच "लोको पायलट" रात्रीच्या वेळी दुरून सिग्नल स्पष्टपणे पाहू शकतो, ज्यामुळे लोको पायलटला बर्याचदा ट्रेनचा वेग कमी करण्याची आवश्यकता देखील नसते. त्यामुळे रात्री ट्रेन वेगाने धावते.