Water Cannon Salute : विमानात एकदातरी बसण्याची सगळ्यांची ईच्छा असते. आजकाल विमानाचा प्रवास आधीपेक्षा सोपाही झाला आहे. लहान असो वा मोठे सगळ्यांना विमानात बसून आकाशाच्या सफरीचा अनुभव घ्यायचा असतो. इतकंच नाही तर विमान कसं चालतं, किती मायलेज देतं किती वेगाने धावतं हेही लोकांना जाणून घ्यायचं असतं. अशीच एक विमानाबाबत आम्ही तुम्हाला एक वेगळी गोष्टी सांगणार आहे. ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं.
'वॉटर सल्यूट'
'वॉटर सल्यूट' म्हणजे विमानावर अग्नीशमन दलाच्या बंबाने पाणी सोडलं जातं. जर तुम्ही कधी असं दृश्य सिनेमात किंवा एखाद्या व्हिडीओत पाहिलं असेल तर अनेकांना वाटू शकतं की, विमान थंड करण्यासाठी त्यावर पाणी टाकलं जात असेल. पण मुळात सत्य वेगळंच आहे.
वॉटर सल्यूट हा विमानाला थंड करण्यासाठी देत असतील असं तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण याचा उद्देश वेगळाच असतो. राहिला प्रश्न विमान थंड करण्याचा तर विमान हे १२ हजार फूट उंचीवर उडत असतात. इतक्या उंचीवर वातावरण फार थंड असतं. त्यामुळे विमान थंड करण्याची काही गरज पडत नाही. तर विमानाला वॉटर सल्यूट करण्याचा उद्देश हा सन्मान करण्याचा असतो.
जुनी आहे परंपरा
तुम्हाला आठवत असेल तर फार पूर्वी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी समुद्र मार्गाचाच वापर केला जात होता. आजही काही प्रमाणात जहाजांचा वापर प्रवासासाठी केला जातो. आधी जेव्हाही एखादं नवीन जहाज समुद्रात उतरत असेल तर त्याच्यावर पाण्याचा वर्षाव करून स्वागत केलं जायचं. ही प्रथा पुढे विमानांसाठीही केली जाऊ लागली.
'वॉटर सल्यूट'चा उद्देश
विमानाला दोनदा वॉटर सल्यूट दिला जातो. एक म्हणजे जेव्हा एखादं विमान एखाद्या विमानतळावरून पहिल्यांदाच उड्डाण घेत असेल तेव्हा आणि दुसरं कारण म्हणजे जर विमानाचा पायलट रिटायर होत असेल तेव्हा. यावेळी वॉटर सल्यूट देऊन त्यांचा सन्मान केला जातो.