भारतात दररोज शेकडो रेल्वे एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये प्रवास करतात. त्यात लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करतात. रोज जवळपास १३००० रेल्वे चालवल्या जातात. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेलच. पण अनेकांना रेल्वेच्या अनेक गोष्टींबाबत काहीच माहीत नसतं. तुम्हीही अनेकदा एक गोष्ट बघितली असेल, पण कधी नोटीस केलं नसेल की, दरवाज्याच्या बाजूला असलेली खिडकी सर्वात वेगळी का असते?
रेल्वेच्या स्लीपर आणि जनरल कोचमध्ये खिडक्यांनी रॉड लावलेले असतात. मात्र, दरवाज्या जवळच्या खिडकीमध्ये सामान्यापेक्षा जास्त रॉड लावलेले असतात. रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनी कधीना कधी हे नोटिस केलं असेलच. पण यामागचं कारण तुम्हाला नक्कीच माहीत नसणार.
दरवाज्या जवळच्या खिडकीमधून चोरी होण्याचा धोका अधिक असतो. चोर अनेकदा या खिडकीतून चोरी करताना आढळले होते. दरवाज्याला लावलेल्या पायऱ्यांवरून या खिडकीपर्यंत सहज पोहोचता येतं.
रात्रीच्या वेळी जेव्हा प्रवाशी झोपलेले असतात, तेव्हा चोर या खिडक्यांमधून सहजपणे सामान चोरी करत होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या खिडक्यांनी सामान्यापेक्षा अधिक रॉड लावण्यात येऊ लागले. जास्त रॉडमुळे यातील गॅप इतका कमी झाला की, त्यातून हात जाणे अवघड होते.
त्यासोबतच दरवाज्यावरील खिडकीला सुद्धा सामान्यापेक्षा अधिक रॉड लावलेले असतात. जेणेकरून रात्री रेल्वे मधेच कुठे थांबली तर चोरांना त्यातून हात टाकून दरवाजा उघडता येऊ नये.