वेगवेगळे ऑफिसेस किंवा मॉलमध्ये तुम्ही टॉयलेटला गेला तर तुम्ही एक वेगळंच चित्र दिसतं. येथील टॉयलेट घरच्यासारखे नसतात. फार स्वच्छतेसोबतच इथे एक प्रश्नात पाडणारी बाब म्हणजे टॉयलेटच्या दरवाज्याखाली असणारा गॅप. तुम्हीही अनेकदा असे टॉयलेट पाहिले असतील आणि हे असे का असतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. पण आज याचं कारण आपण जाणून घेणार आहोत.टॉयलेटमधील गॅपचं कारण...
टॉयलेटच्या दरवाज्यांमध्ये खालून गॅप असण्याला काही कारणं आहेत. त्यातील एक कारण म्हणजे असं असल्याने टॉयलेट स्वच्छ करण्यास सोपं जातं. पब्लिक टॉयलेटचा वापर अनेक लोक करतात. त्यामुळे लवकर बेकार होतात. अशात खालून उघड्या दरवाज्यांमुळे फ्लोर पुसण्यास सोपं होतं. पण यामागे हे एकच कारण नाहीये. आणखीही काही कारणांनी टॉयलेटचे दरवाजे छोटे ठेवले जातात.
दुसरं कारण...
अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्सचा वापर सेक्शुअल अॅक्टिविटीसाठीही करतात. लोकांनी असे प्रकार करू नये म्हणूनही टॉयलेटचे दरवाजे खालून छोटे ठेवले जातात. तसेच वरूनही टॉयलेट यासाठीच उघडे ठेवले जातात.
तिसरं कारण...
टॉयलेटचे दरवाजे लहान असण्याचं आणखी एक कारण म्हणजे जर लहान मुलगा आत गेला किंवा एखादा आजारी व्यक्ती आता गेला आणि त्याने आतून लॉक लावलं तर त्याला बाहेर काढण्यासाठी सोपं काम होतं. तसेच कुणी बाथरूममध्ये बेशुद्ध पडलं तर या छोट्या दरवाजामुळे त्यांना बाहेर काढणं सोपं होतं.
चौथं कारण...
अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्समध्ये दारू-सिगारेट ओढतात. दरवाजा लहान असल्याने आत बसलेल्या लोकांच्या अशा कारनाम्यावरही लक्ष ठेवता येतं.