शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

रेल्वे स्थानकांच्या नावापुढे का लावलं जातं जंक्शन, सेंट्रल, टर्मिनस? काय आहे याचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 10:48 PM

जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे नेटवर्क भारतात आहे. भारतीय रेल्वेनं दररोज लाखो लोक प्रवास करतात.

What is Junction Central Terminus : जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे नेटवर्क भारतात आहे. भारतीय रेल्वेनं दररोज लाखो लोक प्रवास करतात. ती देशाची जीवनवाहिनी म्हणून काम करते. रेल्वे हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रेल्वे प्रवासाच्या वेळी असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील, ज्यांची उत्तरे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छाही झाली असेल. ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस X का लिहिलेले असते? रेल्वे स्थानकाच्या मागे जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस असं का लिहिलेलं असतं. याचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊया नक्की याचा अर्थ काय?

जंक्शनचा अर्थ काय?अनेक स्थानकांच्या नावामागे जंक्शन लिहिलेलं असतं. सहसा ते प्रमुख स्थानकाच्या नावाच्या मागे असतं. जर एखाद्या स्टेशनच्या नावापुढे जंक्शन लिहिलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की या स्थानकावर ट्रेनला जाण्यायेण्यासाठी एकापेक्षा अधिक रुट आहेत. अशा स्थानकांच्या मागे जंक्शन लिहिलेले असते. 

सेंट्रलचा अर्थ काय?काही रेल्वे स्थानकांच्या नावांसोबत सेंट्रल लिहिलेलं असतं. स्टेशनच्या शेवटी सेंट्रल लिहिलं असेल तर याचा अर्थ त्या शहरात एकापेक्षा अधिक रेल्वे स्टेशन आहेत. ज्या स्टेशनच्या नावासमोर सेंट्रल लिहिलेलं असते ते त्या शहरातील सर्वात जुनं रेल्वे स्थानक आहे. तसंच सेंट्रलवरून हे देखील कळतं की ते स्थानक शहरातील सर्वात वर्दळीचं रेल्वे स्थानक आहे.

टर्मिनस/टर्मिनलचा अर्थकाही स्थानकांवर त्यांच्या नावांपुढे टर्मिनस किंवा टर्मिनल लिहिलेलं असतं. जर एखाद्या रेल्वे स्थानकाच्या नावासोबत टर्मिनस किंवा टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ त्या स्थानकाच्या पलीकडे रेल्वे ट्रॅक नाही. म्हणजे ट्रेन ज्या दिशेहून आली आहे, त्याच दिशेनं परत जाते.

टॅग्स :railwayरेल्वे