घरातील वयोवृद्ध लोक हे नेहमीच सांगतात की, पत्ते खेळणं चांगली गोष्ट नाही. लोक पत्त्यांसोबत जुगार खेळतात. पण या पत्त्यांमध्ये अनेक रहस्य आणि कथा लपल्या आहेत. तुम्हाला माहीत असेलच की, ५२ पत्त्यांमध्ये चार राजे असतात. यातील ३ राजांना मिशी असते. पण चौथा राजा क्लीन शेव असतो. प्रश्न हा आहे की, ५२ पत्त्यातील चौथ्या राजाला मिश्या का नसतात? कार्ड डिझाइन करणाऱ्याकडून काही चूक झाली? की यामागे काही कारण आहे?
सायकल ब्रॅन्डचे काही विशिष्ट इंग्लिश-अमेरिकन पत्त जाड-जड कागदाचे किंवा प्लास्टिकपासून तयार केलेले असतात. हे पत्ते ओळखण्यासाठी त्यावर काही वेगवेगळे रूपांकन असतात. आणि यांचा वापर जुगार खेलण्यासाठी एका सेटच्या रूपात केला जातो. खेळात सुविधेसाठी सामान्यपणे हे पत्त तळ हाताच्या आकाराचे असतात. पत्त्यांच्या एका पूर्ण सेटला पॅक किंवा डेक म्हटलं जातं. बरेच लोक केवळ मनोरंजनासाठी पत्ते खेळतात. (हे पण वाचा : गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप का तोडतात? जाणून घ्या कारण...)
भारतात प्रचलित पत्ते हे इंग्लंडहून आलेले आहेत. यांवर पान, विट, पक्षी आणि हुकूम रेखाटले आहेत. हे चिन्ह सर्वातआधी एका फ्रान्सच्या व्यक्तीने १६व्या शतकात तयार केले होते. त्यामुळे शाही पत्त्यांमद्ये ट्यूडर राजांच्या वेशभूषेत दिसतात. (हे पण वाचा : भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....)
ज्याला मिशी नाही त्या राजाचं नाव काय?
पत्त्यांमध्ये ज्या राजाच्या चित्रात मिशी नाही त्याच राजाचं नाव आहे King of Hearts. King of Hearts नावाने एक सिनेमाही आला होता. त्यातही राजाला मिश्या नव्हत्या. तो फार सुंदर आणि क्लीन शेव आहे. पण British newspaper The Guardian नुसार, सुरूवातीला या राजालाही मिश्या असायच्या. पण एकदा कार्ड रिडिझाइन केलं जात होतं तेव्हा डिझायनर त्याला मिश्या काढणं विसरला आणि तेव्हापासून किंग ऑफ हार्ट्स विना मिश्या असलेला राजा झाला.