Indian Currency : जगभरातील देशांची आपली एक वेगळी करन्सी असते. या करन्सीच्या माध्यमातून देश चालतो. सध्या भारतात नवीन नोटांचं चलन आहे. या नोटा 100, 200, 500 आणि 2000 हजारांच्या आहेत. यावर सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळे फीचर्स दिलेले असतात.
तुम्ही कधी बारकाईने बघितलं असेल तर नोटांच्या एका कोपऱ्यात काही तिरप्या रेषा असतात. नोटांच्या किंमतीच्या हिशोबाने या रेषांची संख्या वाढत जाते. पण अनेकांना माहीत नसतं की, या रेषा कशासाठी दिलेल्या असतात. यांचा काहीतरी अर्थ असतो.
काय आहे रेषांचा अर्थ?
नोटांवर बनलेल्या या रेषांना 'ब्लीड मार्क्स' असं म्हणतात. हे ब्लीड मार्क्स खासकरून नेत्रहीन व्यक्तींसाठी तयार केलेले असतात. नोटांवर असलेल्या रेषांना स्पर्श करून ते सांगू शकतात की, ही नोट किती रूपयांची आहे. याच कारणाने 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर वेगवेगळ्या संख्येत या रेषा असतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या रेषांमुळे नेत्रहीन लोक नोटेची ओळख पटवू शकतात.
कोणत्या रेषेवर किती रेषा?
उदाहरण सांगायचं झालं तर 100 च्या नोटेवर दोन्ही बाजूने चार रेषा असतात. ज्यांना स्पर्श केल्यावर नेत्रहीन व्यक्तींना समजतं की, ही 100 रूपयांची आहे. तेच 200 रूपयांच्या नोटेवर दोन्ही कॉर्नरला चार-चार रेषा असतात आणि दोन दोन शून्यही असतात. तेच 500 च्या नोटेवर 5 आणि 2000 च्या नोटेवर दोन्ही बाजूने 7-7 रेषा दिलेल्या आहेत. या रेषांच्या मदतीने नेत्रहीन व्यक्ती सहजपणे नोटांची आणि त्यांच्या किंमतीची ओळख पटवू शकतात.