मासे तर तुम्ही अनेक पाहिले असतील, काही दोनशे तर काही पाचशे रूपयांना विकत मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा मास्याबाबत सांगणार आहोत जो कोट्यावधी रूपयांना विकला जातो. एरोवाना मासा दक्षिण अमेरिकेच्या Amazon च्या ओयापॉक आणि रूपुनुनी नदीत आढळतो. तसेच हा मासा गुयानाच्या ताज्या पाण्यातही आढळतो. पण तुम्ही म्हणाल या माशाचं आता काय? तर हा मासा त्याच्या किंमतीमुळे चर्चेत आला आहे. या मास्याला इतकी किंमत मिळते की, तुम्ही वाचून चक्रावून जाल.
एरोवाना हा मासा मुख्य रूपाने गोड पाण्यात राहतो. कारण खाऱ्या पाण्यात त्याची सहनशीलता कमी असते. लोक हा मासा पाळणंही पसंत करतात. फेंगशुईनुसार एरोवानाला घरात ठेवल्याने समृद्धी येते. तसेच अशीही मान्यता आहे की, हा मासा घरात ठेवल्याने संपत्तीची भरभराट होते.
मीडिया रिपोर्टनुसार, एरोवाना नर मासा आपल्या तोंडात साधारण ५० दिवस आपली अंडी ठेवतो आणि तेव्हाच तोंड उघडतो तेव्हा त्याची पिल्लं थोडी मोठी होतात.हा मासा शक्तीशाली आणि साहसी मानला जातो. इतकंच नाही तर हा मासा २० वर्षापर्यंत जिवंत राहतो.
हा मासा १२० सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो आणि याचं वजन जवळपास ५ किलो होऊ शकतं. सामान्य स्थिती या माशाला एक कोटीच्या आसपास किंमत मिळते. पण ब्लॅक मार्केटमध्ये या माशाला साधारण २ कोटीपेक्षा जास्त किंमत मिळते.
एरोवाना मासा मांसाहारी असतो आणि जेव्हा तो जंगलात राहतो तेव्हा पाण्यातील कीटक आणि छोटे मासे खातो. जेव्हा हे मासे पॉटमद्ये असतात तेव्हा मांसाचे वेगवेगळे तुकडे खातात.
हा मासा खूप शानदार उडी घेऊ शकतो. हा पाण्यातून ५ फूट वर उडी घेऊ शकतो. जेव्हा अॅक्वेरिअम टॅंक घरात ठेवाल तर ही परिस्थिती लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. हा मासा जास्तकरून दक्षिण-आशियाई देशांमध्ये सर्वात जास्त आढळून येतो.