काही कपडे असे असतात जे कुठेही दिसले तर लगेच लक्षात येतात की, हे कपडे अमूक अमूक लोकांचे आहेत. त्यातीलच नेहमीच लक्षात राहणारे कपडे म्हणजे कैद्यांचे कपडे. सिनेमा पाहताना कधी असा प्रश्न पडला का की, भारतीय कैद्यांना अशाप्रकारचेच कपडे का दिले जातात? कैद्यांना पांढऱ्या आणि काळ्या रंगाचेच कपडे का दिले जातात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....
कधी झाली सुरूवात अशा कपड्यांची?
आधी कैदी आपल्या दोन जोडी कपड्यात शिक्षा भोगत होते. नंतर १८व्या शतकात अमेरिकेत ऑबर्न प्रिजन सिस्टम लागू करण्यात आली. ज्यानुसार, ज्या कैद्यांना कठोर शिक्षा जात होती, त्यांच्याकडून मेहनत करून घेतली जात होती. कैद्यांना एकमेकांसोबत बोलण्यासही मनाई होती. या सिस्टमनुसारत कैद्यांसाठी एक मोठा बदल करण्यात आला. तो म्हणजे कैद्यांचे कपडे बदलणे. तेव्हा कैद्यांना तुरूंगाच्या थीमनुसार ग्रे-ब्लॅक कलरचे पट्टे असलेले कपडे दिले होते. (हे पण वाचा : १२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य)
काय होतं कारण ?
काही मीडिया रिपोर्टनुसार, सर्वात मोठं कारण हे होतं की, कैद्यांना एक निश्चित प्रकारचे कपडे असले तर ते पळून गेल्यावर त्यांना लोक लगेच ओळखतील आणि ते पोलिसांना सूचना देतील. त्यासोबतच ड्रेस कोड असल्याने कैद्यांमध्ये एक शिस्त येईल, ज्यामुळे ते तुरूंगात चांगलं शिकू शकतील. (हे पण वाचा : एसी भींतीवर वरच्या बाजूलाच का लावला जातो? जाणून घ्या कारण...)
ड्रेससंबंधी खास बाब ही सुद्धा होती की, ग्रे-ब्लॅक पट्ट्यांना एक 'सिंबल ऑफ शेम'च्या रूपात पाहिलं जात होतं. पण जेव्हा कैद्यांच्या मानवाधिकारबाबत बोलणं झालं तेव्हा 'सिंबल ऑफ शेम' हटवण्यात आला. त्यानंतर १९व्या शतकात काळ्या-पांढढऱ्या रंगाचे पट्ट्या असलेले कपडे दिले जाऊ लागले होते.
प्रत्येक देशात वेगळे ड्रेस
प्रत्येक देशातील कैद्यांना वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रकारचे कपडे दिले जातात. कारण प्रत्येक देशाचा आपला वेगळा ड्रेस आहे. भारतात अशाप्रकारच्या कपड्यांची सुरूवात इंग्रजांच्या काळातच झाली होती. त्यावेळीच कैद्यांच्या मानवाधिकाराचा विषय निघाला होता. तेव्हापासून हा ड्रेस कैद्यांना दिला जातो. पण हा ड्रेस सर्वच कैद्यांना दिला जात नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या कैद्यांना शिक्षा सुनावली जाते त्यांनाच हे कपडे दिले जातात, ज्यांना केवळ ताब्यात घेतात त्यांना हे कपडे दिले जात नाहीत.