शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

रोलेक्सचं घड्याळ इतकं महाग का असतं? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 6:10 PM

Rolex Watch Price : मुळात रोलेक्स घड्याळाची बांधणी ही सर्वोत्तम कारागिरीचा नमूना मानली जाते. कारण ही घड्याळ इतर घड्याळांप्रमाणे तयार केली जात नाही.

Rolex Watch Price : घड्याळ वापरणं आज स्टेटस समजलं जातं. आधी लोक पॉकेज वॉचचा वापर करायचे. हे सुद्धा फार स्टेटसचं मानलं जात होतं. नंतर घड्याळं सहज मिळू लागली. आज 100 रूपयांपासून कोट्यावधी रूपयांची घड्याळं मिळतात. पण काही कंपन्यांची खूपच चर्चा होते. त्यातीलच एक म्हणजे रोलेक्स. रोलेक्सचं घड्याळ फार महाग मिळतं. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

सर्वात महागड्या घड्याळीचा विषय निघाला की, जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यांसमोर एकच नाव आधी येतं. ते म्हणजे रोलेक्स. रोलेक्स प्रत्यक्षात अनेकांनी बघितलेली नसते. पण घड्याळांची आवड असणाऱ्यांना रोलेक्सची किंमत नक्कीच माहीत असते. तर अनेकांना असाही प्रश्न पडत असेल की, अखेर या रोलेक्सच्या घड्याळी इतक्या महाग का असतात?

मुळात रोलेक्स घड्याळाची बांधणी ही सर्वोत्तम कारागिरीचा नमूना मानली जाते. कारण ही घड्याळ इतर घड्याळांप्रमाणे तयार केली जात नाही. या घड्याळाचं काम इतक्या बारकाईने केलं जातं की, याची किंमत लाखोंच्या घरात जाते. तसेच ही घड्याळं तयार करण्यासाठी स्पेशलल रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलप लॅब असतात.  

रोलेक्स घड्याळ तयार करण्यासाठी काही निवडक स्पेशालिस्ट्सकच निवडले जातात. यांचाच पगार कोट्यवधींच्या घरात असतो. तसेच या घड्याळाची आणखी एक खासियत म्हणजे या घड्याळांसाठी ९४० एल स्टील वापरलं जातं, जे फारच मजबूत असतं. सामान्य घड्याळांमध्ये ३४० किंवा त्यापेक्षा कमी एल स्टील वापरलं जातं. तसेच रोलेक्सचे पार्ट्स हे हाय टेक मशीनींद्वारे तयार करण्यात येतात.

हे घड्याळ महाग असण्याचं आणखी एक कारण म्हणजे या घड्याळींच्या डायलमध्ये व्हाइट गोल्डचा वापर केला जातो. तसेच यात ज्या नंबर्सचा वापर केला जातो ते सुद्धा स्पेशल प्लॅटिनमपासून तयार केलेले असतात. 

कंपनीनुसार, रोलेक्सच्या घड्याळात पार्ट्स इतक्या बारकाईने लावण्यात येतात की, मोजणारे हैराण होतील. हे फारच काळजीपूर्वक लावावे लागतात. कारण ते लावताना खराब होण्याचाही धोका असतो. रोलेक्समध्ये ज्या मटेरिअलचा वापर होतो ते फार महागडं असतं. हे घड्याळ तयार करताना सोन्याचाही वापर केला जातो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके