जगभरात वेगवेगळ्या अजब डिश असतात. कुठे सडलेलं पनीर खातात तर कुठे कीटक खातात. कुठे फारच अजब अजब डिश खाल्ल्या जातात ज्यांचा कुणी विचारही केला नसेल. पण तुम्हाला 'पापाची थाळी' माहीत आहे का? अशी थाळी जी लोक तोंड लपवून खातात. ही परंपरा फार आधीपासून सुरू आहे. यामागचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल.
आम्ही आज तुम्हाला फ्रान्सच्या एका परंपरेबाबत सांगत आहोत. फ्रान्समध्ये Ortolan bunting नावाचा एक पक्षी आहे. ज्याची डिश लोक तोंड लपवून खातात. यालाच 'पापाची थाळी' असं म्हटलं जातं. असं मानलं जातं की, लोक देवापासून आपले पाप लपवण्याच्या उद्देशाने स्वत:ला रूमालाने झाकून ही डिश खातात. ही एक परंपरा आहे. यूरोप अनेक देशांमध्ये या पक्ष्याच्या मांस खाण्यावर बंदी आणली आहे. स्वत: नेही यावर बंदी आणली आहे. पण अनेक ठिकाणी ही डिश परंपरेच्या नावावर खाल्ली जाते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या डिशला 'पापाची थाळी' का म्हटलं जातं? तर यामागे एक कहाणी आहे. हे पक्षी प्रत्येक वर्षी शरद ऋतुमध्ये आफ्रिकेकडे मायग्रेट होतात. तेव्हाच शिकारी यांना पकडतात. त्यांच्यासोबत खूप क्रूरता केली जाते. अनेक आठवडे त्यांना बॉक्समध्ये कैद केलं जातं. त्यांना खूप खाऊ घातलं जातं. जेणेकरून त्यांचं वजन खूप वाढावं. त्यानंतर त्यांना आगीत भाजलं जातं. परंपरा आहे की, हा पक्षी एकाच वेळी खावा. खाणारेही क्रूरतेने खातात. हेच कारण आहे की, त्यांना तोंड लपवून खाण्याची परंपरा आहे. जेणेकरून कुणी बघू नये.काही वर्षांआधी ही डिश उत्तर यूरोपमध्ये श्रीमंत घरांमधील डायनिंग टेबलची शान होती. रोमन सम्राटांपासून ते फ्रांसीसी राजांपर्यंत ही डिश खात होते. हा पक्षी इतका विशिष्ट होता की, परंपरागत पद्धतीने याला केवळ फार श्रीमंत आणि पादरी लोकच खाऊ शकत होते.