Flush has one large one small button: वॉशरूम हे कोणत्याही घरातील महत्वाचा भाग असतं. ज्याच्या स्वच्छतेची फार काळजी घेतली जाते. अलिकडे घराच्या वॉशरूमपासून ते शॉपिंग मॉलमधील वॉशरूममध्ये मॉडर्न फिटिंग्स बघायला मिळतात. तुम्हीही अनेक वॉशरूममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लश पाहिले असतील आणि वापरलेही असतील. फ्लशमध्ये एक मोठं आणि एक छोटं बटन असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, फ्लशला दोन बटनं का असतात? किंवा एक लहान आणि एक मोठं का असतं?
काय आहे याचं कारण?
मॉडर्न टॉयलेट फ्लशमध्ये दोन प्रकारचे लिवर्स किंवा बटन असतात. ही दोन्ही बटनं एक्टिव वॉल्वशी कनेक्टेड असतात. मोठं बटन दाबल्यानंतर साधारण 6 लिटर पाणी निघतं आणि तेच लहान बटन दाबलं तर 3 ते 4.5 लिटर पाणी निघतं. आता हे जाणून घेऊ की, पाण्याची बचत किती होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर एका घरात सिंगल फ्लशऐवजी Dual Flushing सिस्टीम वापरली तर पूर्ण वर्षात साधारण 20 हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते. भलेही यांचं इन्स्टॉलेशन नॉर्मल फ्लशपेक्षा महागडं असेल, पण याचा वापर करून तुम्ही पाण्याची मोठी बचत करू शकता.
तेच ड्यूअल फ्लश कॉन्सेप्टबाबत बोलायचं तर अमेरिकन इंडस्ट्रीअल डिझायनर Victor Papanek च्या डोक्यातून आली होती. 1976 मध्ये विक्टर पेपनेकने त्याच्या ‘Design For The Real World’ या पुस्तकात याबाबत उल्लेख केला आहे. तुम्हीही इंटरनेटवर सर्च करून डबल बटन सिस्टीमच्या फायद्यांबाबत जाणून घेऊ शकता.