(Image Credit: topyaps.com)
तुम्हाला माहीत असेलच किंवा तुम्ही ऐकलं असेल की, एअरपोर्टवर चेकींग पॉइंटच्या पुढे पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. केवळ चेकींग पॉइंटपर्यंतच तुम्ही पाण्याची बॉटल सोबत ठेवू शकता. पण त्यापुढे तुम्ही पाण्याची बॉटल सोबत घेऊन जाऊ शकत नाही. महत्वाची बाब म्हणजे चेकींग पॉइंटपुढे तुम्ही पाण्याची रिकामी बॉटल घेऊन जाऊ शकता.
पाण्याच्या बॉटलबाबतचा हा नियम जगभरातील सर्वच एअरपोर्टवर पाळला जातो. याचं काय कारण असावं असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर याचं कारण आहे सुरक्षा. पाण्याच्या बॉटलमधून कुणीही लिक्विड स्वरुपात कोणत्याही प्रकारचं विस्फोटक घेऊ जाऊ नये म्हणून हा नियम आहे. असे होऊ शकते की, पाण्याच्या बॉटलमध्ये विस्फोटक घेऊ जातील. अशात प्रत्येक प्रवाशाच्या बॉटलमध्ये पाणी आहे की, अजून काही हे तपासणे तसे कठिण आहे. त्यामुळे पाण्याची बॉटलच बॅन केली आहे.
अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीने अल कायदाचा एक हल्ला हाणून पाडला होता. त्यानंतर हा नियंम तयार करण्यात आला. तेव्हापासून जगभरात हा नियम पाळला जातो.
ज्यावेळी अमेरिकन अधिकारी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी पाहिलं की, हायड्राजन बॉम्ब लिक्विड स्वरुपात मिनरल पाण्याच्या बॉटलमध्ये टाकत होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाण्याच्या बॉटल एअरपोर्टवर बॅन केल्या आहे.