Plastic Water Tank Shape : पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे लोक पाणी साठवून ठेवतात. कुणी बालट्यांमध्ये तर कुणी ड्रममध्ये साठवतात. अनेक घरांमध्ये पाणी साठवण्यासाठी टेरेसवर मोठी टाकीही लावली जाते. पण तुम्ही पाहिलं असेल की, या टाक्यांमध्ये एक बाब कॉमन असते. ती महणजे या टाक्या गोल असतात. चौकोनी किंवा दुसऱ्या शेपमध्ये का नसतात. चला जाणून घेऊ याचं कारण...
पाण्याची टाकी गोल असण्याचं कारण यासाठी लागणाऱ्या खर्चासंबंधी आहे. कारण गोल टाकी तयार करण्यासाठी खर्च कमी लागतो. यासाठी साहित्य कमी लागतं आणि इतर आकारात बनवण्यासाठी खर्च जास्त लागतो.
बऱ्याच लोकांना माहीत असेल की, पाण्याची टाकी PVC पासून तयार होते. ती धातु किंवा मेटलची नसते. त्यामुळे याचा फुटण्याचा धोका जास्त असतो आणि हाच धोका कमी करण्यासाठी या टाक्या गोल आकारात तयार केल्या जातात. ज्यामुळे त्या जास्त काळ सुरक्षित राहतात.
जेव्हाही एखाद्या मोठ्या वस्तूमध्ये पाणी भरलं जातं तेव्हा त्यावर चारही बाजूने दबाव पडतो. असं चौकोनी आकारात जास्त होतं आणि गोलाकारमध्ये कमी होतं कारण सिलॅंडरिकल म्हणजे लांब गोलाकारात असल्याने दबाव पसरतो. म्हणजे टाकी फुटण्याचा धोका कमी राहतो.
त्याशिवाय चौकोनी टाक्यांपेक्षा गोलाकार टाक्या साफ करण्यासाठी सोप्या असतात. हे फायदे लक्षात घेऊन जास्तीत जास्त पाण्याच्या टाक्या या गोलाकार बनवल्या जातात. यांचीच डिमांडही जास्त असते.
आता जाणून घेऊ कि, पाण्याच्या टाकीवर पट्ट्या का असतात? या पट्ट्या पाण्याची टाकी मजबूत करण्याचं काम करतात. उन्हाळ्यात टाकी पसरू नये म्हणून या मदत करतात. त्याशिवाय टाकीवर पडणारा दबावही याने कंट्रोलमध्ये राहतो.