पृथ्वीवर एकापेक्षा एक महागडे जीव-जंतु आहेत. या जीवांची मोठ्या प्रमाणात देश-विदेशात तस्करी केली जाते. ज्याद्वारे कोट्यावधी रूपये कमाई केली जाते. ग्रीन ट्री पायथन जगातील सगळ्यात महागडा साप आहे. ज्याची किंमत 3 कोटी रूपयांपर्यंत असते. तर सगळ्यात महाग कीटक स्टॅग बीटल (Stag Beetle) आहे. ज्याची किंमत 75 ते 80 लाख रूपये असते.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, हस्तीदंताची किंमतही लाखो रूपयांमध्ये असते. त्यासाठी अनेक हत्तींची शिकार केली जाते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा जीवाबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. या जीवाच्या एका दाताची किंमत ह्त्तीच्या दातांपेक्षाही जास्त असते.
आम्ही तुम्हाला सांगतोय रानटी डुकराबाबत. आपली शक्ती आणि वेगामुळे हा प्राणी फार आधीपासून पाठलाग करून शिकार करण्यासाठी ओळखला जातो. यूपी, बिहार, झारखंडसहीत इनेक राज्यांमध्ये हे आढळतात. ते पिकाचं मोठं नुकसान करतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, याच्या दातांना अंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लाखो रूपये किंमत मिळते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जंगली डुकरांचा केवळ एक दात आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 20 लाख रूपयांना विकला जातो.
जशी हस्तीदंतासाठी हत्तींची शिकार आणि त्यांच्या दातांची तस्करी केली जाते, त्याच प्रमाणे जंगली डुकरांच्या दातांमुळे त्यांची तस्करी होते. भारतात त्यांच्या दातांच्या शिकारीवर बंदी आहे. पण परदेशात त्यांची खूप जास्त तस्करी होते. असं मानलं जातं की, या दातांचा वापर तंत्र मंत्रसाठी खूप केला जातो. या कारणाने त्यांची डिमांड जास्त राहते.