एका महिलेच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तीन मुलांची जबाबदारी तिच्यावर आली. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. पण दरम्यानच्या काळात असे काही घडले की एका झटक्यात महिलेचे नशीब पालटले आणि ती करोडपती झाली.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, लेस्ली मॅकनेली असे या 54 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती ब्रिटनमधील मँचेस्टरची रहिवासी आहे. गेल्या वर्षी 59 वर्षीय पती गॅरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गॅरीच्या मृत्यूने लेस्ली खचून गेली आहे. तीन मुलांसह संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली.
अशा परिस्थितीत लेस्लीला थोडी काळजी वाटू लागली. मात्र, तिची समस्या लवकरच दूर झाली. कारण, तिने लॉटरी जिंकली होती, तीही 1 कोटी 72 लाख रुपयांपेक्षा जास्त. विशेष बाब म्हणजे लेस्लीचे पती गॅरी यांनी लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. मात्र लकी ड्रॉ संपण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
लेस्ली म्हणाली की जेव्हा पीपल्स पोस्टकोड लॉटरीने तिचा लॉटरी नंबर जाहीर केला तेव्हा ती रडली. नवऱ्याला आठवून आनंद साजरा करायचा की रडायचा हे तिला समजत नव्हतं. कारण त्याने लॉटरीचे तिकीट घेतले होतं. लेस्ली म्हणते- एकीकडे आम्हाला बक्षीस मिळाल्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे गॅरी हे पाहण्यासाठी जिवंत नसल्याचं दुःख आहे. गॅरी आणि लेस्ली 37 वर्षे एकत्र होते.
कार शोरूममध्ये काम करणाऱ्या लेस्लीने सांगितले की, ही बक्षीस रक्कम माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आयुष्य बदलणारी आहे. मात्र, याआधीही गॅरीची लॉटरी लागली होती पण तेव्हा बक्षिसाची रक्कम खूपच कमी होती. ही रक्कम मुलांसाठी उपयुक्त ठरेल, असं सांगितलं. त्याचं राहणीमान सुधारेल आणि ते नवीन काम सुरू करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.