Viral News : उत्तर प्रदेशातील सासू आणि होणाऱ्या जावयाच्या अफेअरची चर्चा सध्या सगळीकडे चांगली रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि माहिती व्हायरल झाली आहे. होणाऱ्या बायकोच्या आईसोबतच होणारा जावई पळून गेल्यानं एकच गोंधळ उडाला होता. आता त्यांनी पोलिसांकडे सरेंडर केलं आहे. अशात सासू आणि जावयाची एक वेगळी घटना समोर आली आहे. एका तरूणानं ज्या मुलीसोबत लग्न केलं तिच्याच आईसोबतही त्याचं अफेअर सुरू होतं. आता या महिलेनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर तिची कहाणी शेअर केली आहे.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, स्वत: महिलेनं रेडिटवर तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. महिलेनं सांगितलं की, कशाप्रकारे अनेक वर्ष तिच्यासोबत दगा केला गेला. ती ज्या व्यक्तीसोबत सुखानं संसार करत २२ वर्षांनंतर त्याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. अशी माहिती ज्याचा तिला चांगलाच धक्का बसला.
सासू-जावयाचं अफेअर
साधारण ४० वयाच्या महिलेनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, १५ वयाची असताना तिचं एका तरूणासोबत अफेअर होतं. १७ वयाची असताना ती गर्भवती झाली तेव्हा ती आई-वडिलांच्या घरी शिफ्ट झाली. १८ वयात त्यांचं लग्न झालं. आई-वडिलांच्या सांगण्यानुसार, दोघे आजी-आजोबांच्या जुन्या घरात शिफ्ट झाले. घराजवळच महिलेचं माहेर होतं. ४ मुलांसोबत त्यांचा आनंदानं संसार सुरू होता. दरम्यान तरूणाचं असं रहस्य समोर आलं ज्यानं दोन परिवार तुटले.
आपल्या मैत्रिणींसोबत सहलीवरून परत आलेल्या महिलेनं पतीला तिच्या आईसोबत बेडरूममध्ये रंगेहाथ पकडलं. याचा राग धरत महिलेची आई रागानं घरी निघून गेली. मोठ्या वादानंतर तरूणानं १८ वर्षानंतर हे मान्य केलं की, त्याचं त्याच्या सासूसोबत म्हणजे महिलेच्या आईसोबत १८ वर्षापासून अफेअर सुरू आहे. महिलेनं ही बाब आपल्या वडलांना सांगितली आणि एका कार्यक्रमात सगळ्या परिवारासमोरही सांगितली. त्यानंतर महिला पतीपासून आणि महिलेचे वडील त्याच्या पत्नीपासून वेगळे झाले.