Relationship : पती-पत्नीचं नातं फारच नाजूक असतं आणि ते विश्वासवर टिकून असतं. यात थोडी जरी चूक झाली तर हे नातं तुटू शकतं. लग्नाच्या नात्यात दोन लोकांची एकमेकांप्रति समान भावना असणं फार गरजेचं असतं. पण अनेकदा असं होतं नाही. ज्यामुळे नात्यात अंतर निर्माण होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, त्याने त्याच्या पत्नीला झोपेत असं म्हणताना ऐकलं की, तिला तिच्या बेस्ट फ्रेन्डसोबत रोमान्स करायचं आहे. पती म्हणाला की, प्रत्येकजण आपल्या पत्नीला पसंत करत असतो आणि तो इतका बिझी राहतो की, तिच्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो.
या व्यक्तीने एका रिलेशनशिप वेबसाइटवर सांगितलं की, त्याने कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की, त्याची पत्नी त्याला दगा देत आहे. मला वाटत होतं की, मी तिला ओळखतो. मी एका अशा मुलीसोबत लग्न केलं होतं जी माझ्याप्रति इमानदार, हसमुख आणि लॉयल असेल. तिच्या अजिबात दिखावा नाहीये. तिच्या सुंदरतेचं आणि तिच्या पर्सनॅलिटीचं सगळेजण कौतुक करतात. मला नाही वाटत की, सर्वांसोबत मिळून मिसळून राहणं मला अडचणीत टाकेल. पण मला राग येतो जेव्हा माझी पत्नी इतरांची काळजी घेण्यात बिझी असते. ती इतकी बिझी असते की, तिला माझ्यासाठी वेळच नसतो. जेव्हा काही क्षण आम्ही सोबत घालवतो तेव्हा तिचं लक्ष दुसरीकडे असतं. पण मला याचा अंदाज नव्हता की, दुसऱ्या व्यक्तीला ती पसंत करते.
मला याची अजिबात जाणीव नव्हती की, माझी पत्नी आणि माझ्या बेस्ट फ्रेन्डमध्ये काही सुरू आहे. एका दिवस आम्ही बरेच थकलेले होतो तेव्हा आम्ही घरी जाऊन लगेच झोपलो. माझी पत्नी लवकर झोपली आणि मी जागा होतो. कारण माझ्या डोक्यात कामाबाबत काही विचार सुरू होते. अचानक माझी पत्नी झोपेत काहीतरी बडबड करू लागली होती. ती झोपेत बोलताना फारच सुंदर दिसत होती. त्यामुळे ती तिला फार लक्ष देऊन बघत होतो. अचानक तिने माझा बेस्ट फ्रेन्ड अमनचं नाव घेतलं. मला धक्का बसला. अमन माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि आम्ही कॉलेजच्या दिवसांपासून चांगले मित्र आहोत. ती माझ्या सर्वात चांगल्या मित्रासोबत फिजिकल रिलेशन ठेवण्याचं स्वप्न बघत होती. हे ऐकून मी फार हैराण झालो. मला विश्वास बसला नाही की, ती असं करू शकते.
काही वेळाने ती गप्प झाली आणि पुन्हा झोपली. पण ते ऐकल्यानंतर मी झोपू शकलो नाही. मी माझ्या पत्नी आणि मित्राचं सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हाही माझी पत्नी कामात बिझी असायची तेव्हा मी माझ्या मित्राला फोन करायचो. तो सुद्धा त्या दिवशी बिझी राहत होता. याने माझा संशय मजबूत झाला. मग दिवस मी तिचा पाठलाग केला आणि त्या दोघांना मी एकत्र पाहिलं.
त्यानंतर अनेकदा असं झालं. पण मी माझ्या पत्नीला काही बोललो नाही. मला भिती आहे की, जर मी काही बोललो तर ती तिचं सत्य मला सांगेल आणि दुसऱ्यासाठी मला सोडून जाईल. मला तिला गमवायचं नाहीये. पण मला तिला दुसऱ्या पुरूषासोबत शेअर करायचं नाहीये. माझा तर दूरच राहिला. या गोष्टीसोबत जगणं क्षणाक्षणासाठी असह्य होत आहे.