लोकांच्या हयातीत नाहीतर त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्याबाबत बऱ्याच गोष्टी समजत असतात. या महिलेबाबतही तसंच झालं. ही महिला अमेरिकेच्या अटलांटामध्ये राहत होती. दिसायला सुंदर होती. व्यवसायाने लेखिका आणि यूनिवर्सिटी टीचर होती. तिचं नाव होतं मौली ब्रोडक. 8 मार्च 2020 साली तिने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यावेळी ती 39 वर्षांची होती. तिच्या मृत्युनंतर सगळेच हैराण झाले होते. पती ब्लेड बटलर फार दु:खात होता. त्याला हे समजत नव्हतं की, सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मौलीने असं का केलं.
पण मग असं काही झालं ज्याची कल्पना मौलीचा पती ब्लेक बटलर याने केलीही नव्हती. 44 वर्षीय ब्लेकने सांगितलं की, मला हे माहीत होतं की, ती डिप्रेशनमध्ये होती. पण मला सोडून कशी जाऊ शकली? ब्लेकने मौलीच्या आठवणीत एक पुस्तक लिहायला सुरूवात केली. पण त्याला हे समजू शकलं नव्हतं की, ती इतकी दु:खी का होती. नंतर त्याला समजलं की, त्याला मौलीबाबत बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. मौली एक चांगली कवयित्री होती. दोघांची भेट फेसबुकवर झाली होती. तेव्हा ती जेलमध्ये कैद होती.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, लांब केस, निळे डोळे असलेली मौली ब्लेक याला पहिल्या नजरेत पसंत पडली. मौलीने तिच्या एका मित्राकडून गाडी उधार घेतली होती. पण गाडीची कंडिशन खराब असल्याने तिला तुरूंगात जावं लागलं होतं. पण जेव्हा ती पोलिसांच्या गाडीतून उतरून ब्लेकला भेटली तेव्हा खूप आनंदी होती. त्याच दिवशी दोघे बाहेर गेले. रात्र झाली होती. तेव्हा मौलीने ब्लेकला तिचा एमआरआय दाखवला आणि सांगितलं की, तिला आधी ब्रेन ट्यूमर होता. मौलीने सांगितलं की, तिचं बालपण चांगलं नव्हतं. वडिलांनी बॅंक लुटून सट्टेबाजीचं कर्ज चुकवलं होतं. दोनदा तुरूंगात गेले होते. मौलीनेही दुकानात चोरी केली होती. तिची आई आजारी होती.
तिने ब्लेकला तेव्हा हेही सांगितलं की, ती 12 वर्षाची असताना ड्रग्स घेत होती. बॉयफ्रेंडला सिगारेटने तिला चटके देण्याची परवानगीही दिली होती. इतकंच काय तर ब्लेकला ती पहिल्यांदा जेव्हा भेटली तेव्हा विवाहित होती. नंतर ब्लेकने मौलीसोबत 2017 मध्ये लग्न केलं. पण मौलीच्या मृत्युनंतर सगळं काही बदललं. ब्लेकला अशा काही गोष्टी समजल्या, ज्यामुळे ब्लेकच्या पायाखालची जमीनच सरकली.
मृत्युनंतर झाले अनेक खुलासे
ब्लेक बटलरला समजलं की, त्याची पत्नी मौली एक सीक्रेट जीवन जगत होती. ब्लेकने मौलीचा फोन चेक केला. त्याला समजलं की, लग्नाच्या काही दिवसांनंतर ती तिच्या एका स्टुडंटसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिचे अनेक पुरूषांसोबत संबंध होते. फोनमध्ये कमी कपड्यात टॉइजसोबत तिचे अश्लील फोटोही दिसले. तिचे काही व्हिडिओही होते. काही अश्लील वागणुकीचे व्हिडीओ होते. नंतर ब्लेकने इमेल चेक केले. तेव्हा त्याला समजलं की, मौलीने कॉलेजच्या अनेक स्टुडंट्सना तिचे अश्लील फोटो पाठवले होते.
तिने एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. सोबतच त्याला अनेकदा पैसेही पाठवले. ब्लेक म्हणाला की, त्याला या गोष्टी समजल्यावर शांत वाटलं. त्याला हे क्लीअर झालं की, तो त्याच्या पत्नीच्या मृत्युसाठी जबाबदार नाही. त्यासाठी तिच जबाबदार आहे. ब्लेकने तिच्या मृत्युनंतर एका आठवड्याने तिच्यावर पुस्तक लिहायला सुरूवात केली. तो या निष्कर्षावर पोहोचला की, मौलीला मानसिक आजार होता. ती तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. नंतर ब्लेक एका दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला आणि त्यांनी 2022 मध्ये दुसरं लग्न केलं.