मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात एका पत्नीने अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य निभावलं आहे. जिल्ह्यातील सिमलावदा गावातील पाटीदार परिवारातील सून चंद्रकलाचं केवळ गावातच नाही तर आजूबाजूच्या गावातूनही कौतुक होत आहे. लोक तिचं उदाहरण देत आहेत.
पतीला दिली एक किडनी
सिमलावदामध्ये लक्ष्मण पाटीदारच्या दोन्ही किडन्या बेकार झाल्या होत्या. अशात लक्ष्मणची पत्नी चंद्रकला हीच होती जी त्याला जीवनदान देऊ शकत होती. संपूर्ण परिवाराची नजर आणि आशा चंद्रकलावर होती. चंद्रकलाने आपला पत्नी धर्म निभावत पतीचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तिच्या पतीचा जीव वाचला. असं करून चंद्रकलाने परिवार आणि गावातील लोकांच्या मनात घर केलंय.
गावातील लोकांनी केली पूजा
गावातील लोकांनी पाटिदार परिवारातील या सूनेचा पती धर्म आणि त्याग बघून गावातील मंदिरात किडनी ट्रान्सप्लान्टआधी पूजा केली. आणि देवाकडे पती-पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. पती-पत्नी लक्ष्मण आणि चंद्रकलाचं किडनी ट्रान्सप्लान्ट ऑपरेशन बुधवारी गुजरातच्या नाडियाडमध्ये झालं. याआधी संपूर्ण गावाने मिळून अंबा माता मंदिरात महाभिषेक केला. तर हनुमानाच्या मंदिरात सुंदरकांडचं आयोजन केलं होतं.
कुटुंबियांनी सांगितलं की, लक्ष्मणच्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या. त्याच्यावर इंदुर आणि नडियादमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनुसार, लक्ष्मणचा जीव वाचवण्यासाठी त्याची किडनी ट्रान्सप्लान्ट करणं गरजेचं होतं. कठिण काळात लक्ष्मणची पत्नी चंद्रकलाने पतीला किडनी देण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर नडियाडमध्ये किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली.
लक्ष्मण पाटीदार शेतकरी परिवार आहे. पाटीदार दाम्पत्याला १७ वर्षीय मुलगी आणि १४ वर्षीय मुलगा आहे. किडनी खराब झाल्याने आणि ट्रान्सप्लान्टच्या अवघड ऑपरेशनमुळे या परिवाराची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. ज्यामुळे गावातील लोकांनी मदतीसाठी प्रशासन आणि समाजसेवकांकडे विनंती केली.