'पति-पत्नी और वो' याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशीच घटना मध्यप्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण येथिल एका महिलेनं आपल्या पतीचे लग्न प्रेयसीशी लावून दिलं आहे. लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिलेनं आपल्या पतीचं प्रेयसीशी लग्न लावून दिलं. सदर महिलेच्या पतीचे त्याच्या प्रेयसीशी जवळपास १ वर्षांपासून संबंध होते. कौटुंबिक कोर्टाचे वकील रजनी रजानी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एक दाम्पत्य समुपदेशनासाठी त्यांच्याकडे आले होते.
त्या व्यक्तीने सांगितले की, ''आमचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले आहेत. परंतु गेल्या एका वर्षापासून त्याचे एका मैत्रिणीशी प्रेमसंबंध आहेत. हे प्रकरण इतके टोकाला पोहोचले की, विवाहित नसतानाही प्रेयसीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी मला जाणवलं की, मी माझ्या प्रेयसीशिवाय राहू शकत नाही. मग मी काय करायला हवं? मला माझ्या पत्नीबाबत कोणतीही तक्रार नाही. ती नेहमीच मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. माझ्या पत्नीला प्रेयसीसाठी सोडण्याची इच्छा अजिबात नाही. ''
वकिल रजनी रजानी यांनी सांगितले की, कायद्याचा विचार केल्यास दोन महिलांसोबत राहणं अशक्य आहे. रजनी यांनी दाम्पत्याचा संसार तुटू नये यासाठी त्या माणसाच्या प्रेयसीची समजूत काढली पण ती काही ऐकण्यास तयार नव्हती. दुसर्याच दिवशी कौटुंबिक कोर्टाच्या वकिलाने त्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला बोलावून सल्ला दिला. यादरम्यान, पतीने काय हवे आहे ते पत्नीला सांगितले. हे ऐकून त्याची पत्नी दुखवली आणि ती रडू लागली. त्यानंतर तिने काहीवेळ मागून घेतला. पुन्हा ती आपल्या पतीसह वकिलाकडे आली तिनं वकिल रजनी यांना सांगितले की, आम्ही दोघीजणी एकाच छताखाली नांदू शकणार नाही. म्हणून मी पतीपासून लांब जाण्याचा निर्णय घेते. भारीच! एकेकाळी एअरपोर्टवर साफ सफाई करायचा; अन् आता करोडोंच्या टर्नओव्हरवाल्या कंपनीचा माल
पत्नीने कायद्याच्या नियमांचे पालन करत घटस्फोट घेण्याची माहिती दिली. पतीने पैसे आणि प्रॉपर्टी देण्याबाबत सांगितले तेव्हा त्याच्या पत्नीने नात्यातील आत्मसन्मानाचे कारण पुढे करत काहीही घेण्यास नकार दिला. कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करून पतीशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे पठ्ठ्यानं झाडाला साखळीनं बांधली स्कॉर्पिओ; अन् आनंद महिंद्रा म्हणाले,....