सोशल मीडिया किंवा ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून महिला-पुरूषांच्या संबंध जुळल्याच्या आणि नंतर वेगळे झाल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. काही दिवस गैरफायदा घेऊन दगा देणाऱ्या घटनाही घडत असतात. बिहारमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाईन लूडो खेळत असताना खेळणाऱ्या पार्टनरच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर ती पतीला सोडून त्या दुसऱ्या व्यक्तीकडेही गेली. ती गेल्यावर इकडे पतीनेही घटस्फोट न घेता गपचूप दुसरं लग्न केलं. आता आपल्या प्रियकराकडून परत आलेली पत्नी पतीकडे पालन-पोषणाचा खर्च मागत आहे.
बिहारच्या भागलपूरमधील ही घटना आहे. इथे ऑनलाईन लूडा खेळता खेळता दोन मुलांची आई असलेली महिला एका व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि घर सोडून त्याच्याकडे गेली सुद्धा. मुलांचाही विचार तिने केला नाही. ती उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या प्रियकराच्या घरी गेली.
इकडे पती पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करून मोकळा झाला. आता जेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीला त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजलं तर ती सरळ प्रियकराला सोडून सासरी पोहोचली आणि पालन-पोषणाचा खर्च मागत आहे.
याबाबत पत्नी पूजा कुमारी म्हणाली की, “२०१७-१८ मध्ये माझं लग्न गौतम कुमारसोबत झालं होतं. त्याची आई, बहीण, वहिनी कुणालाही मी आवडत नव्हते. मला खूप त्रास देत होत्या. माझी इतकीच चूक झाली की, ऑनलाईन लूडो खेळता खेळता मी एका तरूणाच्या प्रेमात पडले आणि त्याच्याकडे पळून गेले. तरूण यूपीमधील होता आणि त्याचं नाव विनोद आहे. मला घटस्फोट न देता त्याने आता दुसरं लग्न केलं. आता माझी इतकीच मागणी आहे की, आता त्याने लपून लग्न केलंच आहे तर माझा काही आक्षेप नाही. मला ठेवायचं असेल तर ठेवू शकतो नाही तर मुलांसोबत मला त्याने खर्चाला पैसे द्यावे. कारण मला अनेक आजार आहेत”.
तेच पती म्हणाला की, “माझं लग्न पूजा कुमारीसोबत २०१७ मध्ये झालं होतं आणि २०२२ मध्ये ती मी घरी नसताना पळून गेली होती. तिला शोधण्यासाठी मी सूरतला सुद्धा गेलो होतो. ती सापडली नाही त्यामुळे मी हैद्राबादला मजुरी करण्यासाठी गेलो. २ महिन्यांनी पत्नी आपल्या माहेरी परतली होती. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी मला सांगितलं की, तिच्याकडून चूक झाली. त्यांचं ऐकून मी माझ्या पत्नीला माफ केलं. पण मला नंतर समजलं की, पूजा तिच्या प्रियकराकडे राहून आली आहे. तेव्हा मी याच महिन्यात १७ तारखेला मी दुसरं लग्न केलं. आता मी पूजा कुमारीला सोबत ठेवणार नाही”.
सध्या पती-पत्नीमधील ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. लोक त्यांचं प्रकरण ऐकून अवाक् झाले आहेत. आता गावातील लोक त्यांच्या स्तरावर वाद मिटवण्याचा प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.