एका पाठोपाठ एक तब्बल ५ पुरुषांशी लग्न करणारी महिला चांगलीच चर्चेत आली आहे. महिलेनं कुठल्याही पतीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केले. विना घटस्फोट लग्न करण्याच्या या कृत्यामुळे महिलेला कोर्टात उभं करण्यात आले. तिच्या या कारनाम्यामुळे आता तिला जेलमध्ये जावं लागतंय. ५ पती असणाऱ्या या महिलेचा एक बॉयफ्रेंड होता. त्यानं एका मुलाखतीत तिच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे.
हे प्रकरण ब्रिटनचं आहे. ४३ वर्षीय वेन हार्पर, ५ पती असलेल्या एमिलीसोबत १८ महिन्यांपासून रिलेशनमध्ये होता. परंतु एमिली त्याचा विश्वासघात करतेय हे समजताच त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केला. एमिली वेनला एका हॉस्पिटलला भेटली होती. वेन त्या हॉस्पिटलमध्ये अपघातानंतर दाखल होता. त्याठिकाणी एमिलीही एडमिट होती. तिच्यावर छोटं ऑपरेशन होणार होते. त्याठिकाणी दोघांनी एकमेकांना पाहिले तेव्हा वेननं तिच्या सौदर्याचं कौतुक केले.
वेनला जेव्हा कळालं एमिलीचे ५ पती आहेत तरीही त्याने तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. परंतु जेव्हा तरीही एमिली विश्वासघात करतेय अशी शंका आल्यानंतर वेनने तिच्यावर आरोप करत ब्रेक अप केले. वेन मुलाखतीत म्हणाला की, मी तिच्यासोबतचं नाते तोडले जेव्हा ती माझा विश्वासघात करतेय हे रंगेहाथ पकडलं. माझ्याकडे आता तिच्या आठवणीही नाहीत. फोटो नाही. काहीच नाही. एमिली ही एडल्ट मूवीजमध्ये काम करायची. पहिल्याच मुलाखतीत एमिलीनं वेनला तिच्याकडे राहण्यासाठी जागा नाही म्हटलं. त्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर एमिली वेनसोबत राहू लागली.
एकाहून अधिक पुरुषांशी लग्न करण्याचं प्रकरण २००४ मध्ये कोर्टात पोहचलं तेव्हा एमिली त्यात दोषी आढळली. तेव्हा तिला ६ महिने जेलमध्ये जावं लागले. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. तेव्हा एमिलीला पुन्हा शिक्षा ठोठावली. ४३ वर्षीय एमिलीनं ५ पुरुषांशी लग्न केले आहे. तिने कुणालाही घटस्फोट दिला नाही. एमिलीनं वयाच्या १८ व्या वर्षी १९९६ मध्ये पॉल रिग्बीसोबत पहिलं लग्न केले. त्यानंतर ३ महिन्यातच दोघे वेगळे राहू लागले.
३ वर्षांनी एमिलीनं शॉनसोबत लग्न केले. त्यानंतर मित्र साइमन थोरपेसाठी त्यालाही सोडून दिले. एमिलीने थोरपेसोबत लग्न केले. त्यानंतर क्रिस बॅरेट, जेम्स मैथ्यूजशी लग्न केले. एमिलीला पहिल्यांदा जेलमध्ये जावं लागलं कारण ती मैथ्यूच्या एका मित्रासोबत राहत होती. मैथ्यूनं त्याबाबत पोलिसांना कळवलं. एकाहून अधिक पुरुषांशी लग्न केल्याचा आरोप एमिलीवर लागला. २००४ मध्ये एमिलीला पहिल्यांदा शिक्षा झाली. ती ६ महिने जेलमध्ये होती. जेलमधून बाहेर पडल्यानंतर तिने एशले बेकरसोबत लग्न केले. पाच पती असूनही एमिलीनं वेनसोबत रिलेशन ठेवले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"