शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

‘बायको हवी’- लंडनच्या प्लॅटफॉर्मवर होर्डिंग्ज !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 8:38 AM

‘‘मनाजोगी बायको हवी’’ अशा आशयाची होर्डिंग्ज थेट लंडनमधल्या ट्युब स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लागली असतील, काही हजार पाऊंड मोजून ती लावणारा वेडा माणूस मुळ भारतीय असला, तर?

‘‘मनाजोगी बायको हवी’’ अशा आशयाची होर्डिंग्ज थेट लंडनमधल्या ट्युब स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लागली असतील, काही हजार पाऊंड मोजून ती लावणारा वेडा माणूस मुळ भारतीय असला, तर? - हे जर-तर सोडा, लंडनमध्ये राहाणाऱ्या एका भारतीय तरुणाने खरोखरच हा उद्योग केलाय आणि तो सध्या जगभर चर्चेचा विषय ठरलाय!

गावातली, शहरातली पाण्याची एखादी उंच टाकी किंवा एखादं उंचच उंच झाड.. पाण्याच्या या टाकीवर किंवा या झाडाच्या धोकादायक शेंड्यावर जाऊन एखादा ‘लग्नाळू’ तरुण जाऊन उभा राहतो.. आणि तिथून तो  दम देतो... लवकरात लवकर माझं लग्न करून द्या.. नाहीतर मी इथून उडी मारतो.. हा खरंच तिथून उडी मारेल की काय म्हणून खाली उभे असलेले, त्या ‘तरुण’ मुलाचे आईबाप, नातेवाईक मोठ्या अजीजीनं, सांगत असतात... खाली उतर बेटा.. तुझं लग्न लावून देतो.. शेवटी खूपच नाकदुऱ्या काढल्यावर तो कसाबसा खाली उतरतो.. काही वेळा तर पोलीस किंवा अग्निशामक दलाच्या मदतीनं त्याला खाली उतरवावं लागतं...

कधीतरीच घडणारी ही घटना नाही. अशा अनेक घटना विशेषत: ग्रामीण भागात आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतात. इंटरनेट, सोशल मीडिया आणि उच्चभ्रूंच्या जगाने मात्र आता काहीच्या काही कल्पक मार्ग शोधायला सुरुवात केली आहे.  लंडनमधील एका लग्नाळू भारतीय तरुणानं नुकतीच केलेली एक जाहिरात सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या तरुणाचं नाव आहे जीवन भाचू. भारतीय वंशाचा हा तरुण मार्केटिंग प्रोफेशनल आहे आणि लंडनमध्ये पार्ट टाईम डीजे म्हणूनही  काम करतो.चांगल्या वधूच्या शोधासाठी त्यानं एक हटके प्रयोग केला आहे. त्यासाठी त्याने केलेली  कृती सध्या अख्ख्या जगातील अनेकांचं लक्ष वेधून घेते आहे. आपल्याला मनासारखी बायको मिळावी, यासाठी या पठ्ठ्यानं काय करावं?.. ‘बायको पाहिजे’ म्हणून त्यानं थेट रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच मोठमोठे होर्डिंग्ज लावले. ऑक्सफर्ड सर्कसच्या सेंट्रल आणि बेकरलू लाईनच्या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या या भव्य होर्डिंग्जवर मोठ्या अक्षरात त्यानं लिहिलं आहे... ‘मी आयुष्याची चांगली साथीदार  शोधतोय.. बघा, हा खरंच फायद्याचा सौदा आहे.. ‘जमलं’ तर एका सर्वोत्तम भारतीय तरुणाला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता !’...

- या होर्डिंग्जसाठी त्यानं हजारो पाऊंड्सही मोजले आहेत हे विशेष! इतक्या जाहीरपणे आणि थेटपणे बायकोला ‘मागणी’ घालणाऱ्या जीवनच्या या कृतीचं, त्याच्या धाडसाचं अनेकांनी कौतुक केलं, तसंच ‘काय हे वेडपट चाळे’ म्हणून अनेकांनी त्याला मूर्खातही काढलं. पण, जाहिरात करण्याआधी आणि नंतरही लोकांच्या कोणत्याही मताला त्यानं फारशी किंमत दिली नाही. त्याला जे हवं होतं तेच त्यानं केलं. 

बायको शोधण्याच्या जीवनच्या या अभिनव प्रयोगानं लंडनमध्येच असलेल्या भारतीय उपखंडातील दुसऱ्या एका तरुणानंही प्रेरणा घेतली. त्याचं नाव मोहम्मद मलीक. त्यानं तर इंग्लंडमधील अनेक शहरांत ‘बायको पाहिजे’ची मोठमोठी होर्डिंग्ज लावली! भारतात ज्याप्रमाणे वर्तमानपत्रं आणि मॅट्रिमोनिअल साइट्सवर ‘वर पाहिजे/वधू पाहिजे’च्या जाहिराती केल्या जातात, त्याचंच हे एक वेगळं, अधिक सर्जनशील रुप आहे असं काही जणांना वाटतं . या जाहिरातींवर दोन्ही बाजूंनी लोकांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी त्यांच्या हिमतीलाही दाद दिली आहेच.. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक चांगली, वाईट गोष्ट अतिशय झपाट्यानं व्हायरल होते आणि संपूर्ण जगभरात पसरते. त्याचीच प्रचिती आता हे दोघंही तरुण घेत आहेत. वर्तमानपत्रात आणि मॅट्रिमोनिअल साइट्सवर बऱ्याचदा ‘रंजक’ जाहिराती केल्या जातात.. मुलगी गोरी आणि सुंदरच हवी, कॉन्व्हेन्टमध्ये शिकलेली असावी, तरी घरकाम आवडणारी, खटल्याचा संसार चालवू शकणारी असावी..’ असे उल्लेख असतात. अर्थात आता काही मॅट्रिमोनिअल साइट्सनी रंगाचा उल्लेख टाळायला सुरुवात केली आहे. जीवनच्या या अभिनव मागणीला अनेकांनी पाठिंबा दर्शवला असला, तरी असे प्रकार जास्त ताणले जाऊ नयेत आणि आपली मर्यादा त्यांनी सोडू नये, असा उपदेशाचा डोसही पाजला आहे. आपलं प्रेम मिळवण्यासाठी पूर्वीच्या प्रेमींपैकी काही जणांनी डोंगरदऱ्या तुडवल्या, तर काहींनी चक्क युद्ध केलं.. आजच्या इंटरनेटच्या युगात संभाव्य रोमिओ मीमसदृश जाहिरातींचा मारा करतात आणि त्यातून आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळवतात..

माझ्या हृदयाची राणी मला मिळेलच...‘‘तरुण वयात प्रत्येकजण आपल्या आयुष्याच्या जोडीदाराच्या शोधात असतो. त्यासाठी अनेकजण अनेक मार्ग अवलंबतात. काही जण ‘खऱ्या प्रेमा’च्या बाणानं विद्ध होण्याची प्रतीक्षा करतात.. तो योग जुळून येतोच असं नाही, जुळून आला, तरी आजकाल तो कायमस्वरुपी टिकेल याची शाश्वती नाही. अशावेळी भावी बायकोला जाहीर आवाहन करण्याचा एक प्रभावी मार्ग माझ्यासमोर होता, त्याच मार्गाचा मी उपयोग केला, माझ्या हृदयाची राणी मला मिळेलच, याची मला खात्री आहे’’, असं जीवन आणि मोहम्मद या दोघांचंही म्हणणं आहे..