भारतात हिंदी भाषेचा वापर सर्वाधिक होतो. देशातील बहुतांश लोकांना हिंदी भाषा समजते. पण आता या हिंदी भाषेत अनेक भाषांतील शब्दांचे मिश्रण झाले आहे. जसे, इंग्रजी, फारशी, अरबी. हे हिंदी शब्द नाहीत, पण लोक या शब्दांचा सर्रास वापर करतात. उदाहरणच द्यायचे, तर असाच एक शब्द आहे क्रिकेट. आपण क्रिकेट अगदी सहजपणे बोलून जातो. पण हा इंग्रजी शब्द आहे. असे अनेक शब्द आहेत, जे हिंदी नसले तरी प्रचलित आहेत. आज आम्ही असाच एक प्रश्न विचारत आहोत, ज्याचे उत्तर आपल्याला गुगलच्या मदतीशिवाय द्यायचे आहे.
खरे तर, हा प्रश्न आमचा नाहीच. सोशल मिडियाचा आहे. @upcopsachin नावाच्या ट्विटर यूजरने प्रश्न विचारला आहे की, 'रेल्वे स्टेशन'ला हिंदीमध्ये काय म्हणतात?' या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत असेल तर, कमेंट करून सांगा.
अनेक लोकांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जवळपास सर्वांनाच या प्रश्नाचे अचूक उत्तर देता आलेले नाही. पण जर आपल्याला या प्रश्नाचे अचूक उत्तर माहीत असेल, तर नक्की सांगा.