एका मादी लांडग्याने प्रेमाच्या शोधात १४ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. मागच्या आठवड्यात या लांडग्याचा मृत्यू झाला. शास्त्रज्ञ या लांडग्याला त्याच्या गळ्यात असलेल्या ट्रांसमिटरच्या माध्यामातून ट्रॅक करत होते. रिपोर्टनुसार हा लांडगा पार्टनरच्या शोधात आपल्या कुटुंबाला कायमचं बाय बोलून निघाला. आपलं घरदार सोडून निघालेल्या या लांडग्याने आपल्या सोबतीच्या शोधात कॅलिफोर्नियाची सीमा पार केली.
(image credit-couote lives in maine)
रोज २१ किलोमीटर प्रवास केला
ऑक्टोबर २०१७ मध्ये या मादी लांडग्याच्या गळ्यात बायोलॉजिस्टने कॉलर ट्रांसमिटर लावला. यानुसार त्यांच्या निदर्शनास आले की ही मादी लांडगा जंगलात भटकलेली होती. कधीकधी तर खाण्यासाठी प्राण्यांना मारत सुद्दा होती. ती तिच्या सोबत्याच्या शोधात दररोज तब्बल २१ किलोमीटर पायी चालत होती.
(image credit- economics times)
लांडग्याचे घर सोडणे हे खूपचं सामान्य आहे. रिसर्चकर्त्याच्यामते लांडगे जेव्हा १ ते २ वर्षाचा होतात त्यावेळी घर सोड़ून जातात. त्यानंतर स्वतःचा एरिया तयार करतात. ऑरेगनमध्ये राहण्याआधी अनेक वर्ष ती कॅलिफोर्नियामध्ये होती. QR 57 हे नाव मादी लांडग्याला दिलं आहे. मागच्या बुधवारी शास्ता काऊंटीमध्ये या मादी असलेल्या लांडग्याची बॉडी मिळाली. वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट तीच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. या विषयी माहिती देत असलेल्या व्यक्तीला १ लाख ८० हजार रूपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.