Fraud : तुम्ही लोकांची फसणवूक केलेल्या मोठमोठ्या ठगांबाबत वाचलं असेल. हे सगळे लोकांच्या मधे राहून असे काही कारनामे करतात की, हैराण व्हायला होतं. अशा लोकांना 420 म्हटलं जातं. अशाच एका महिलेचा मोठा कारनामा समोर आला आहे. या महिलेने फसवणूक करून कोट्यावधी रूपयांची संपत्ती आपल्या नावावर करून घेतली होती. या महिलेने 800 रूपये खर्च करून तीन कोटी रूपयांचा बंगला आपल्या नावे केला होता.
ही घटना अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचं नाव ऑरेलिया सूगिया आहे. या महिलेने तिच्या घरमालकाला फसवून अशी काही फसवणूक केली त्याला काही समजलंही नाही. तिने घरमालकाचं घरच आपल्या नावे करून घेतलं. हे घर एक फार मोठी हवेली आहे आणि याची किंमत तीन कोटी रूपये इतकी आहे.
मदतीसाठी जात होती
पण जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा महिला पकडली गेली. पोलिसांनी तिला अटक केली आणि तिच्यावर केसही दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने पोलिसांना सांगितलं की, हा बंगला 78 वर्षीय रोजमेरी मीका यांचा होता आणि ती नेहमीच त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या घरी जात होती. पण एक दिवस रोजमेरी यांनी स्वत: हा बंगला त्यांच्या नावाने केला.
महिलेने पोलिसांना हे सगळं खोटं सांगितलं होतं. कारण मकान मालकाने हे सगळं खोटं असल्याचं सांगितलं. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा घर मालकाने आपल्या घरातील लोकांना सांगितलं की, महिलेने त्याची किती मोठी फसवणूक केली. तिने केवळ 800 रूपये खर्च करून हे सगळं केलं होतं. इतकंच नाही तर तिने त्यांच्या खोट्या सह्याही केल्या होत्या.