आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, वेस्टर्न देशांमध्ये खुलेपणा किंवा वागण्यात मोकळेपणा अधिक असतो. येथील महिला त्यांना आवडणारे कपडे परिधान करण्यासाठी स्वतंत्र आहेत. पण एका महिलेला पॅरिससारख्या ठिकाणी एका रेस्टॉरन्टमध्ये तिला तिचा आवडीचा ड्रेस घालण्यापासून रोखण्यात आलं आणि सांगितलं की, तिला जॅकेट घालावं लागेल. पॅरिसला फॅशन आणि आधुनिकतेचं महानगर म्हटलं जातं. तिथे अशी घटना घडणं फारच आश्चर्याचं आहे. महिलेने तिची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आयशा गोनालेज नावाची महिला तिच्या मैत्रिणीसोबत पॅरिसमधील एका रेस्टॉरन्टमध्ये गेली होती. जिथे ती जीन्स आणि ब्रालेट घालून गेली होती. पॅरिससारख्या शहरात अशा कपड्यांवर आक्षेप घेतला जाऊ शकत नाही. कारण इथे कपड्यांवर कोणतंही बंधन नाहीये.
पण आयशाला सांगण्यात आलं की, तिने जॅकेट घातलं तरच तिला रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश मिळेल. हा किस्सा आयशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर शेअर केला. ती म्हणाली की, तिला आणि तिच्या एका मैत्रिणीला रेस्टॉरन्टच्या स्टाफकडून वेलकम गेलं नाही. इतकंच नाही तर तिला जॅकेट घालूनच जेवण करावं लागलं.आयशाने स्पॅनिशमध्ये तिची कहाणी सांगितली आणि म्हणाली की, जर तुम्ही मुलगी असाल आणि तुम्ही पॅरिसमध्ये आलात तर कधीच टॉप घालून येऊ नका. नाही तर तुम्हालाही माझ्यासारखं जॅकेट घालण्याची वेळ येऊ शकते. आयशाने सांगितलं की, जेव्हा ती रेस्टॉरन्टमध्ये जात होती तेव्हा एक व्यक्ती तिच्याकडे आली.
आधी आयशाला वाटलं की, तो विचारेल की, तुम्हाला जास्त थंडी तर वाचत नाहीये ना? पण त्याने जवळ येऊन सांगितलं की, तुम्ही टॉपच्या वर काही घालू शकता का? आयशा म्हणाली की, तिला जॅकेट घालावं लागलं. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.