Doctors Remove 55 Batteries From Woman's Gut: एका 66 वर्षीय महिलेने मुद्दामहून स्वत:ला नुकसान पोहोचवण्यासाठी 50 पेक्षा जास्त बॅटरी गिळल्या. नंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून डॉक्टरांनी तिच्या पोट आणि कोलनमधून बॅटरी काढल्या. महिलेने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या काही वेळानंतर पाच एए बॅटरी खाल्ल्या होत्या. या बॅटरी तिने स्वत:ला नुकसान पोहोचवण्यासाठी खाल्ल्या होत्या. तिने एकूण 55 बॅटरी खाल्ल्या होत्या. आयरिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, सुरूवातीला महिलेने न मोजताच बॅटरी खाल्ल्या. ज्यानंतर तिला सेंट विसेंट यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
डॉक्टरांनी आधी विचार केला होता की, रूग्ण स्वाभाविक रूपाने आपल्या शरीरातून बॅटरी बाहेर काढू शकतो. पण नंतर स्कॅनच्या माध्यमातून समजलं की, बऱ्याच बॅटरी तिच्या पोटात आहेत. ज्यामुळे तिची तब्येत बिघडत आहे. तिने पहिल्या आठवड्यात केवळ पाच बॅटरी खाल्ल्या होत्या. बॅटरी जड असल्याने तिला वेदना होत होत्या. त्यामुळे त्या सर्जरी करून काढण्यात आल्या. डॉक्टरांनी तिच्या पोटात एक छोटं छिद्र केलं आणि 46 बॅटरीज काढल्या.
लाइव्ह सायन्सनुसार, कोलनमध्ये अडकलेल्या चार बॅटरीसाठी वेगळी सर्जरी करण्यात आली आणि कसंतरी करून त्यांनाही बाहेर काढण्यात आलं. डॉक्टर म्हणाले की, 'आमच्या पाहण्यात आलेली ही अशाप्रकारची पहिलीच केस आहे. सुदैवाने तिच्या शरीराला काही इजा झाली नाही. महिला आता सुखरूप आहे.