लग्नात नेहमीच काहीना काही विचित्र घडत असतं. कधी भांडणं होतात तर कधी रूसवे-फुगवे होतात. कधी कधी तर विचित्र कारणांवरून लग्नही मोडतात. मात्र, चीनमधून एका लग्नातील सर्वात वेगळी अन् भावूक करणारी घटना समोर आली आहे. या घटनेची कल्पना स्वप्नातही कुणी केली नसेल. लग्नात मुलाच्या आईची नजर तिच्या होणाऱ्या सूनेच्या हातावर पडली आणि ते थक्क झाली. इतकेच नाही तर मुलाची आई जोरजोरत रडू लागली.
झालं असं की, ज्या कपलचं लग्न होणार होतं ते भाऊ-बहीण निघाले. जेव्हा महिलेने नवरीच्या हातावर जन्मावेळी असलेलं एक निशाण पाहिलं तेव्हा तिने लगेच आपल्या मुलीला ओळखलं. सांगितले जात आहे की, ही घटना जिआनग्सू प्रांतातील सोझोउची आहे आणि हे लग्न ३१ मार्चला होत होतं. (हे पण वाचा : ठरलं तर! अडीच फूट उंचीच्या अजीमला मिळाली नवरी, वाचा काय करते मुलगी आणि बघा तिचा फोटो!)
चीनी मीडियात या घटनेवरून भरभरून चर्चा होत आहे. जेव्हा मुलाच्या आईने नवरीला तिच्या हातावरील निशाणी पाहून तिच्या आई-वडिलांबाबत विचारलं. तर तिने सांगितले की, तिला तिच्या आई-वडिलांनी २० वर्षांपूर्वी दत्तक घेतलं होतं. त्यांना ती रस्त्याच्या कडेला पडलेली सापडली होती. (हे पण वाचा : वाह! इलेक्ट्रीक सायकलवर वरात अन् तुळशीची वरमाला; असा पार पडला ‘ईको फ्रेंडली लग्नसोहळा, पाहा फोटो)
या खुलाशानंतर मुलगी तिच्या आईला मिठी मारून जोरजोरात रडू लागली आणि आपल्या बायोलॉजिकल आई-वडिलांबाबत विचारू लागली. पण या कहाणीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा लग्न मोडलं नाही. नवरी-नवरदेव दोघेही भाऊ बहीण असल्याचं समोर आलं तरी सुद्धा हे लग्न मोडलं नाही. कारण नवरदेवाला सुद्धा दत्तक घेतलं गेलं होतं. आणि नवरीच्या खऱ्या आईला या लग्नावरून काहीच अडचण नव्हती.
असे म्हणतात की, नशीब फारच विचित्र खेळ खेळतं. स्थानिक मीडियानुसार, २० वर्षाआधी जेव्हा या महिलेची मुलगी हरवली होती तेव्हा खूप प्रयत्न करूनही मुलगी सापडली नाही तर तिने एक मुलगा दत्तक घेतला होता. आता त्याच मुलासोबत तिच्या मुलीचं लग्न झालं आहे. कारण ते दोघेही बायोलॉजिकल भाऊ-बहीण नाहीत. या लग्नाला आलेले पाहुणेही हा सगळा प्रकार पाहूण भावूक झाले आणि त्यांनी आई-मुलीला शुभेच्छा दिल्या.