कुणाचं नशीब कधी उजाळेल, हे सांगता येत नाही. केवळ 400 रुपये खर्च करून एक महिला करोडपती झाली. ही महिला जवळपास अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागली. लॉटरी जिंकल्यानंतरही महिलेचा नशिबावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तिने अनेक वेळा तिकीट तपासले.
अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या या महिलेने 400 रुपयांच्या कूपनच्या बदल्यात लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. मात्र, या महिलेची सविस्तर माहिती देण्यात आली नाही. महिलेने तिच्या कारमध्ये बसून लॉटरीची जिंकलेली रक्कम तपासली. तिने अडीच कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्याचे पाहून तिचा विश्वासच बसला नाही. यानंतर महिलेने अनेक वेळा तिकीट तपासले आणि लॉटरी अॅपवर जाऊन कन्फर्मही केले.
बऱ्याच वेळा तिकीट तपासल्यानंतर या महिलेने कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकल्याचे निश्चित झाले. यानंतर महिलेने आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना याची माहिती दिली. हे ऐकून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
ही रक्कम जिंकल्यानंतर माझी थकित बिल भरेन. तसेच, मी सुट्टीवर जाण्याचाही विचार करत आहे. याशिवाय, लॉटरी जिंकलेली रक्कम बचत म्हणून ठेवणार आहे, असे या 41 वर्षीय महिलेने सांगितले. दरम्यान, या महिलेने लॉटरीचे कॅशवर्ड टाइम्स 5 तिकीट न्यू जर्सीच्या ट्रेंटन शहरातून खरेदी केले.
...जेव्हा एखाद्या व्यक्तीने दोनदा लॉटरी जिंकलीUPI.com नुसार, या महिन्याच्या सुरुवातीला मिशिगनमधील आणखी एक व्यक्ती भाग्यवान ठरली. या व्यक्तीने मिशिगन लॉटरीमधून दोन समान तिकिटे खरेदी केली. या दोन्ही तिकिटांमधून त्या व्यक्तीने जॅकपॉटची रक्कम जिंकली. दरम्यान, या व्यक्तीला विसरण्याची समस्या होती. या कारणामुळे त्यांनी फक्त एक प्रकारचे तिकीट खरेदी केले होते. दोन्ही लॉटरी तिकिटांमधून त्याने 90 लाख रुपये (प्रत्येक तिकिटातून 45 लाख रुपये) जिंकले.