शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

आरंर! महिलेच्या केसामध्ये पक्षानं केलं घरटं, राहिला ८४ दिवस अन् त्यानंतर महिलेचे झाले 'हे' हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 5:45 PM

लंडनहून घानामध्ये स्थलांतरित झालेल्या हानाची एका लहान पक्षासोबत मैत्री (Woman friendship with Bird) झाली. ही मैत्री इतकी घट्ट आहे की, सध्या जगभर त्यांची चर्चा सुरू आहे.

असं म्हणतात 'मैत्री' (Friendship) हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. प्राणी (Animal) असो किंवा माणूस (Human) एकदा लळा लागल्यानंतर ते नातं सहजासहजी तुटत नाही. सर्व सजीवांना प्रेमाची भाषा सहज कळते. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हाना बॉर्न टेलरसोबत (Hannah Bourne Taylor) घडला. लंडनहून घानामध्ये स्थलांतरित झालेल्या हानाची एका लहान पक्षासोबत मैत्री (Woman friendship with Bird) झाली. ही मैत्री इतकी घट्ट आहे की, सध्या जगभर त्यांची चर्चा सुरू आहे.

डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, हाना बॉर्न टेलर २०१३ पासून तिच्या पतीसोबत घानामध्ये राहत होती. रॉबिनची नवीन नोकरी असल्यामुळे तो कामात व्यस्त असायचा. अशा परिस्थितीत एकटी पडलेल्या हानानं निसर्गाला (Nature) जवळ केलं. त्यादरम्यान, एका वादळामुळे तिच्या आयुष्यात एका लहान पक्ष्याची एंट्री झाली.

हाना सांगते की, वादळानंतर तिला एक लहान पक्षी जमिनीवर पडलेला दिसला. तो पक्षी त्याच्या सहकाऱ्यांपासून वेगळा झाला होता आणि वादळामुळे (Storm) कदाचित त्याचं घरटंही उडून गेलं होतं. तो पक्षी खूप अशक्त होऊन मरणासन्न अवस्थेत होता. हानानं त्या पक्ष्याला घरी आणलं आणि त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. यासाठी तिनं बरीच माहितीदेखील मिळवली. आपल्या या नवीन मित्रासाठी हानानं एक पुठ्ठ्याचं घरटंदेखील (Nest) तयार केलं. किमान 12 आठवड्यांनंतरच पक्ष्याला जंगलात पाठवता येईल, असा सल्ला तज्ज्ञांनी हानाला दिला होता. या काळात हानानं पक्ष्याची काळजी घेतली.

सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे हानासोबत राहणारा पक्षी तिलाच आपली आई समजत होता. हानाच्या अंगाखांद्यावर पक्षी झोपत असे. थोडंसं उडण्यास शिकल्यानंतर तो पक्षी दिवसभर हानाच्या मागे फिरायचा आणि तळहातावरून खांद्यावर उडी मारायचा. विशेष म्हणजे त्यानं हानाच्या केसांमध्ये स्वत:चं घरटं (Nest in Hairs) तयार केलं होतं. तो दररोज हानाच्या लांबसडक केसांना घरट्यासारखं गुंडाळून त्यात जायचा. सुमारे ८४ दिवस तो पक्षी हानाच्या केसांतील घरट्यात राहिला.

दोघांनाही एकमेकांचा खूप लळा लागला होता. परंतु, निसर्गाच्या नियमानुसार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हानानं त्या पक्ष्याला हळूहळू पक्ष्यांच्या थव्यात (Swarm) नेण्यास सुरुवात केली. त्यानं तीन वेळा थव्यासोबत उडून जाण्याचं टाळलं मात्र, चौथ्यावेळी तो पक्षी इतर पक्ष्यांसोबत उडून गेला. हानानं या पक्ष्यासोबतच्या आपल्या मैत्रीचा किस्सा ट्विटरवर सर्वांसोबत शेअर केला आहे. हाना आणि या पक्ष्याची मैत्री सध्या चर्चेचा विषय झाला आहे. अनेकांनी हानाचं कौतुकही केलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके