जगभरात अनेक विचित्र कामे असतात. काही करिअर तर असे असतात ज्यांवर तुमचा विश्वासही बसणार नाही. इंग्लंडच्या सरीमधील महिलेने जेव्हा आपल्या कामाबाबत खुलासा केला तेव्हा लोक हैराण झाले. तिने सांगितलं की, तिने पुरूषांना टॉर्चर करून 2.55 कोटी रूपयांची कमाई केली आहे.
फर्नहॅमची 31 वर्षीय अरनेई 'एरी' मॅक्टन्स एक डॉमीनेटरिक्सच्या रूपात काम करते. पुरूष तिच्या हातून टॉर्चर करून घेण्यासाठी तिला पैसे देतात. बोलण्यातून अपमान करण्यापासून ते फटके मारून घेण्यापर्यंत एरी आपल्या करिअरमधून दर तासाला जवळपास 18 हजार रूपये कमाई करते.
तिचा दावा आहे की, आपल्या करिअरच्या माध्यमातून तिने अनेक लग्न तुटण्यापासून वाचले आहेत. ती सांगते की, 'मी नेहमीच मोकळ्या विचारांची राहिली आहे. त्यामुळे जेव्हा मला समजलं की, पुरूष टॉर्चर होण्यासाठी पैसे देण्यास तयार आहेत, तर मला लक्षात आलं की, मला माझ्या स्वप्नातील करिअर मिळालं आहे.
एरी म्हणाली की, डोमीनेटरिक्स बननं फार फायदेशीर ठरू शकतं. काही क्लाएंटने मला सांगितलं की, मी त्यांचा संसार वाचवण्यासाठी कशी त्यांची मदत केली. मुळात त्यांच्या फॅंटसीमध्ये त्यांच्या जोडीदाराकडून साथ मिळत नसल्याने ते दु:खी होते. फॅंटसी पैसे देऊन पूर्ण करत होते.
19 वर्षांची असताना तिला पहिला डॉमीनेटरिक्स असण्याचा अनुभव मिळाला, जिथे तिने एका अनोळखी व्यक्तीला चाबकाने मारलं होतं. ती सांगते की, एक तरूण तिच्याजवळ आला आणि त्याने मला त्याला चाबकाने मारण्यास सांगितलं. मी तेच केलं.
एरी म्हणाली की, मी त्याच्या शरीरावर हळूच चाबकाने मारणं सुरू केलं. मला जसं लक्षात आलं की, त्याला हेच हवं तर मलाही हे आवडू लागलं. 2011 मध्ये 25 वर्षाची असताना एक फुल टाइम डॉमीनेटरिक्स बनली. आणि त्यासाठी वेबसाइटही बनवली. तिचं मत आहे की, ती लोकांचं लग्न मोडण्यापासून वाचवते.
ती म्हणाली की, 'मला एक दिवस एका व्यक्तीचा ई-मेल आला. ज्याची ईच्छा होती की, मी माझ्या पायांच्या बोटांनी त्याच्या चेहऱ्याला दाबावं. ही अजब फॅंटसी आहे, पण त्याला तेच हवं होतं. एकाची ईच्छा होती की, मी त्याचा अपमान करावा'.
एरी आता दर महिन्यात 20 क्लाएंट्सना भेटते आणि त्यांना मारून किंवा त्यांचा अपमान करून चांगले पैसे कमावते. तिच्या या करिअरबाबत परिवाराला काही समस्या नाही.