नोकरी न मिळण्याची वेगवेगळी कारणं तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण कधी तुमच्या सुंदरतेमुळे नोकरी नाकारली गेली असं कधी ऐकलं नसेल. पण असा दावा एका महिलेने केला आहे. कायद्याचं शिक्षण घेतलेली आयरीना कोवा ३३ वर्षांची आहे. आयरीनाने नोकरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला काही नोकरी मिळाली नाही. शेवटी हार मानून तिने स्वत:चा बिझनेस सुरू केला.
आयरीना आता रिटेल कंपनी सुरू केली आहे. ज्याद्वारे ती विंटेज कपड्यांची ऑनलाइन विक्री करते. पण ती नाराज आहे. कारण तिने दावा केलाय की, तिचं सुंदर असणंच तिच्या करिअरची सर्वात मोठी अडचण आहे. आयरिनानुसार, सुंदरतेमुळे तिला आतापर्यंत नोकरी मिळाली नाही.
रशियामध्ये जन्माला आलेल्या आयरीना कोवाला लंडनमध्ये नोकरी हवी होती. आयरीना सांगते की, 'मी फार आकर्षित आहे. याच कारणामुळे मला लंडनमध्ये नोकरी मिळाली नाही. मी जिथेही नोकरीसाठी जाते तिथे महिला मला घेत नाहीत, कारण त्या मला घाबरतात. तर पुरुष मला गंभीरतेने घेत नाहीत. त्यांना वाटतं की, त्यांनी मला घेतलं तर त्यांचं कामावर लक्ष लागणार नाही'.
आयरीना आधी काही क्लाएंट्ससाठी बिझनेस डेव्हलपमेंट म्हणूण काम करत होती. पण तिचं मत आहे की, तिच्या सुंदरतेने तिचं करिअर खराब केलं. 'द सन' या ब्रिटीश वृत्तपत्राशी बोलताना तिने सांगितले की, 'माझं आकर्षक असणं मुलाखतीदरम्यान आणि नोकरी मिळाल्यानंतर दोन्ही स्तरांवर माझ्यासाठी नकारात्मक ठरलं. ज्या रिक्रूटमेंट एजंटच्या मी संपर्कात होते, त्याने मला केसांचा रंग बदलण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून मी अधिक प्रोफेशनल दिसावी. पण मला नोकरी मिळाली नाही'.
आयरीना पुढे सांगते की, 'मी केवळ केसांचा रंगच बदलला नाही तर डोळे चांगले असूनही मी चष्मा वापरू लागले. माझ्या एक्स बॉसने तर मला स्पष्टपणे सांगितलं होतं की, पुढे जाण्यासाठी तू तुझ्या लुक्सचा वापर करणं बंद कर. पण मी असं काहीच केलं नव्हतं. मी जशी आहे तशी आहे'.
ती सांगते की, ती जास्त मेकअपही करत नाही. कारण तिचे डोळे आणि ओठ आधीच मोठे आणि आकर्षक आहेत. मला वाटतं कॉर्पोरेट कल्चरसाठी मी जास्त ग्लॅमरस आहे आणि मी यात फिट बसत नाही. लग्न झालेले पुरूष मला नोकरीवर ठेवत नाहीत, कारण जर त्यांची पत्नी ऑफिसमध्ये आणि त्यांनी मला पाहिलं तर त्यांच्यात वाद होऊ शकतात'.