ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय सोफी जोन्सने एक विचित्र तक्रार पोलिसात दिली आहे. सोफी जोन्सने दावा केला आहे की, ती गरम टबमध्ये आंघोळ करण्यासाठी तिच्या बाथरूममध्ये जाते एक कावळा तिच्याकडे पाहतो. सोफीचा दावा आहे की, हा पक्षी त्यांच्या घर आणि कारच्या खिडकीला टोच मारीत असतो. कावळ्याच्या या कृतीने सोफीला खूप भीती वाटते. एवढेच नाही तर या कावळ्याने त्यांच्या शेजाऱ्यांवरही हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
सोफी जोन्सने पोलिसांना सांगितले की. 'त्या कावळ्याचा मला इतका मानसिक त्रास होतोय की, मी एखाद्यावेळी कोवळ्या उन्हात अंग शेकायला जाण्याचा विचार करते तेव्हाही असं वाटतं की, तिथे तो कावळा येईल.' ती म्हणाली की, 'घराच्या भिंतीवर बसलेला कावळा नेहमी माझ्याकडे घुरून बघत असतो. मी अविवाहित स्त्री आहे त्यामुळे हे सर्व मला खूप भीतीदायक वाटते. कावळ्यामुळे मी मानसिक तणावात आहे.
कावळा कायम आपल्यावर नजर ठेवून असतो. मी समुद्रकिनारी फिरायला गेली तेथेही तो पाठलाग करतो, घराबाहेर पडल्यावर कारच्या खिडकीला टोच मारतो. या सर्व गोष्टींमुळे सोफी तणावात असल्याचं सांगते.