मानसिक आरोग्य जगभरात एक मोठं आव्हान बनलं आहे. ज्यामुळे जगभरातील शेकडो लोक दररोज आत्महत्येसारखं गंभीर पाउल उचलतात. जगात अशा अनेक संघटना आहे ज्या मानसिक आरोग्यावर काम करतात. पण यासाठी पैसा जमा करणं एक मोठं आव्हान आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला मानसिक आरोग्याबाबत होत असलेल्या कामात योगदान देण्याची इच्छा झाली तर यासाठी तिने एक वेगळी पद्धत वापरली. त्या लंडनमध्ये कडाक्याच्या थंडीत १० मैलापर्यंत नग्न होऊन सायकल चालवत होत्या. हे करून या महिलेने मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेसाठी पैसे जमा करण्याचा प्रयत्न केलाय.
या महिलेचं नाव आहे केरी बार्न्स, ज्यांनी मानसिक आरोग्याची वाढती आकडेवारी बघून आणि चुलत बहिणीच्या आत्महत्येनंतर याबाबत पाउल उचण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यानुसार, नेहमीच त्यांच्या डोक्यात विचार सुरू राहत होता की, त्यांनी काय करावं? त्या घरातही याबाबत चर्चा करत होत्या. एक दिवस जेव्हा त्या त्यांच्या हाउसमेटसोबत बोलत होत्या तेव्हा तिने गमतीत सल्ला दिला की, नग्न होऊन कडाक्याच्या थंडीत सायकलवर फिरावे. हा विचार त्यांना खूप आवडला आणि त्या नग्न होऊन लंडनच्या रस्त्यावर निघाल्या.
आत्महत्या रोखण्याचा उद्देश
ladbible.com च्या रिपोर्टनुसार, केरी म्हणाल्या की, त्यांना आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता वाढवायची इच्छा होती आणि यासाठी काम करणारी संस्था MIND साठी त्याना काही पैसे जमा करायचे होते. खासकरून जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे मानसिक आरोग्याने आणखी जास्त आव्हान तयार केलंय. ज्यामुळे आत्महत्येसारखे गंभीर पावले उचलली जात आहेत.
थंडी बघता केरी यांनी स्वत:ला यासाठी तयार केलं होतं. पूर्णपणे नग्न होऊन सायकल घेऊन लंडनच्या रस्त्यावर निघण्यापूर्वी केरी यांनी थंड पाण्याने आंघोळ केली. पण हे जास्त फायदेशीर नाही ठरलं. त्यानंतरही त्यांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. खासकरून वॉटरूलू ब्रीज क्रॉस करताना त्यांना अधिक थंडी जाणवली. पण केरीनुसार, एकूण दिवस चांगला गेला.