शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: राज्यात एक दिवसाचा दुखवटा; NCPA मध्ये घेता येणार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
2
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्चा देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
3
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
4
"मोदी महान आहेत, ते वडिलांसारखे दिसतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
5
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
6
Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट
7
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
8
"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?
9
Ratan Tata : दानशूर! त्सुनामी असो किंवा कोरोनाचा उद्रेक... प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर
10
"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट
11
"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट
12
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
13
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
14
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
15
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
16
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
17
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
18
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
19
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
20
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर

बाबो! १५ दिवसांत २१ जणांना डेट केलं या महिलेनं, सांगितली या डेटिंगची 'गंदी बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 2:56 PM

ऑस्ट्रेलियात राहणारी एक महिला लोकांना डेटिंग अ‍ॅपद्वारे डेटिंग करण्याचा योग्य मार्ग शिकवत आहे.

आजकाल डेटिंग कल्चर (Online Dating) भारतातही खूप लोकप्रिय झालं आहे. परदेशात हे वर्षानुवर्षे चालत आलं आहे. आता लोक ऑनलाइन डेटिंग वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे अनोळखी लोकांशी कनेक्ट होतात आणि नंतर त्यांच्याशी जवळीक वाढवतात. जेव्हा दोघांच्या आवडी-निवडी जुळतात तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये येतात. पण या गोष्टींमध्ये फसवणूक किंवा इतर समस्यांचाही धोका असतो. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियात राहणारी एक महिला लोकांना डेटिंग अ‍ॅपद्वारे डेटिंग करण्याचा योग्य मार्ग शिकवत आहे (Dating Tips).

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहणारी हेलन चिक एक लेखिका आणि डेटिंग तज्ज्ञ (Dating Expert) आहे. तिने डेटिंगशी संबंधित एक पुस्तकही लिहिलं आहे, ज्यामध्ये तिनं स्वतःच्या अनुभवांच्या आधारे लोकांना डेट कसं करावं हे सांगितलं आहे. पण हेलनची सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे तिने एकदा फक्त २१ दिवसांत १५ मुलांना डेट केलं होतं (Woman Date 15 Men in 21 Days).

आपल्या अनुभवाविषयी बोलताना हेलनने सांगितलं की, जेव्हा ती न्यूयॉर्कला गेली तेव्हा तिने २१ दिवसांत १५ पुरुषांना डेट केलं. हेलन अलीकडेच किंडा सॉर्टा डेटिंग नावाच्या पॉडकास्टवर गेस्ट म्हणून उपस्थित होती, ज्यामध्ये तिने तिच्या डेटिंगचं रहस्य उघड केलं. तिने सांगितलं की तिचा दोनदा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे ती डेटिंगला खूप गांभीर्याने घेते. तिने सांगितलं की ती फक्त टिंडरद्वारे डेट करते आणि काही गोष्टींची काळजी घेऊन इतर लोक देखील टिंडरचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात.

हेलनने सांगितलं की, जेव्हा कोणी दुसऱ्या शहरात जात असेल आणि तिथे डेट करण्याचा विचार करत असेल तर तेव्हा तिथे जाण्यापूर्वीच काही दिवस आधी सेटिंगमध्ये बदल करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं लोकेशन बदला. त्यामुळे असं होईल की त्या शहरात जाण्याच्या काही दिवस आधी तुम्हाला तिथल्या लोकांचे प्रोफाईल दिसायला लागतील आणि आधीपासूनच आपल्या आवडी-निवडीच्या आधारावर आपण लोकांची निवड करू शकतो. यानंतर, तुम्ही त्याठिकाणी पोहोचल्यावर त्याच दिवशी एक छोटीशी डेट किंवा मीटिंग निश्चित करा म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीला पुढे भेटायचं की नाही हे ठरवता येईल.

 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके