आधी मृत घोषित केलेल्या आणि नंतर अंत्यसंस्कारावेळी अचानक प्रेत उठून बसल्याच्या काही घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतीलच. अशीच एका महिेलेची Paraguay मधील घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Daily Mail ने दिलेल्या वृत्तानुसार, येथील महिला अचानक पुन्हा जिवंत झाली. तेही अंत्यसंस्काराच्या काही मिनिटांआधी. साधारण एक तास आधी ही महिला पती आणि मुलीसोबत डॉक्टरकडे आली होती. काही वेळाने डॉक्टरांनी महिलेच्या पतीला आणि मुलीला निधनाची बातमी दिली.
Gladys Rodríguez Duarte असं या महिलेचं नाव असून ती ovarian cancer patient आहे. ती San Fernando येथील नेहमीच्या डॉक्टरकडे गेली होती.
स्थानिक मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही 50 वर्षीय महिलेला सकाळी साडे नऊ वाजता हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं आणि तिला Dr. Heriberto Vera यांनी तपासलं. Dr. Vera यांनी 11 वाजून 20 मिनिटांनी Rodríguez Duarte मरण पावल्याचं घोषित घोषित केलं.
ही बातमी महिलेच्या पतीला आणि मुलगी Sandra Duarte ला दिली. मृत्यूचं कारण cervical cancer असं देण्यात आलं. या महिलेच्या मुलीने डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आणि त्यांनी तिच्या आईला जिवंत ठेवण्याचा साधा प्रयत्नही केला नसल्याचं तिने सांगितलं.
महिेलेच मुलगी म्हणाली की, 'त्याला असं वाटलं की ती मरण पावली आणि तिचं निर्वस्त्र शरीर एखाद्या जनावरासारखं मला सोपवलं. सोबतच मृत्यूचा दाखलाही दिला. त्याने तिला वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही'.
हॉस्पिटलकडून तिचा मृतेदह असलेली बॅग परिवाराकडे सोपवण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी ती जिवंत असल्याचं उघड झालं. अचानक एका व्यक्तीला दिसलं की, महिला बॅगमध्ये हलत आहे. तेव्हा तिला लगेच बॅगेतून बाहेर काढण्यात आलं.
नंतर या महिलेला लगेच एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं.