आईबाबा होणं हा प्रत्येक कपलच्या आयुष्यातील एक अनमोल, अविस्मरणीय असा क्षण असतो. पण हा प्रवासही तितकाच मोठा आणि गुंतागुंतीचाही असतो. बाळाला ९ महिने पोटात वाढवल्यानंतर महिलेला डिलीव्हरीवेळी किती तरी वेळ असह्य अशा प्रसूती वेदनांचाही सामना करावा लागतो. पण एका महिलेने मात्र प्रसूती वेदनांशिवाय फक्त ४ मिनिटांतच बाळाला जन्म दिला आहे (Woman Deliver Child In 4 Minutes). यामुळे आईबाबा बनलेलं हे कपलही शॉक झालं.
किम असं या महिलेचं नाव आहे. तिने आपल्या प्रेग्नन्सीचा आणि डिलीव्हरीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपण फक्त चार मिनिटांत आपल्या बाळाला जन्म दिल्याचा दावा या महिलेने केला आहे. आपल्या टिकटॉक अकाऊंटर किमने सांगितलं, सकाळी तिचा नवरा ऑफिसला गेला. त्यानंतर ती सकाळी १० वाजता ती आपल्या रूटिन चेकअपसाठी गेली. तिथून परतली ती बाळाला घेऊनच. डॉक्टरांनी तिला लगेचच भरती करून घेतलं. पण तिच्या डिलीव्हरीची तयारी होण्याआधीच तिला बाळ झालं.
तिथं तिचा बीपी तपासण्यात आला. त्यानंतर पोटातील बाळाचे हार्टबीट्सही तपासण्यात आले. तिचं शरीर डिलीव्हरीसाठी किती तयार झालं आहे हे डॉक्टर तपासत होते. तेव्हा डॉक्टरांना दिसलं की किम आता कधीही बाळाला जन्म देऊ शकते. तेव्हा तिची प्रसूतीची तारीख आली नव्हती. डॉक्टरांनी तिला लेबर पेन होतं का हे विचारलं. पण किमला तसं काहीच वाटत नव्हतं. तरी डॉक्टरांनी डिलीव्हरीची तयारी केली. पण त्याआधीच अवघ्या ४ मिनिटांत तिने आपल्या बाळाला जन्म दिला.
आपण इतक्या लगेच आई होऊ याचा तिलाही अंदाज नव्हता. डिलीव्हरीच्या दोन मिनिटं आधी तिने आपल्या नवऱ्याला फोन करून डॉक्टर आपली डिलीव्हरी करणार आहेत, असं सांगितलं. पण इतकं लवकर सर्व होईल याचा विचारही त्यांनी केला नव्हता.