बिस्किट खाणं कुणालाही आवडतं. बरेच लोक सकाळी नाश्ता म्हणून बिस्किट खातात. काही लोक चहासोबत कुकीज आणि बिस्किट खातात. लहान मुलांसाठी तर बिस्किट जेवणच असतं. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, न्यूयॉर्कमध्ये एक महिला बिस्किट खाऊन कोमात गेली. तिच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं. अनेक आठवडे ती हॉस्पिटलमध्ये होती आणि एक दिवस तिचा मृत्यू झाला. याचं कारण सगळ्यांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला समजेल की, या महिलेने काय केलं?
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मॅन्चेस्टरची राहणारी 25 वर्षीय ओर्ला बैक्सेंडेल (Orla Baxendale) एक प्रोफेशनल डान्सर होती. 2018 मध्ये द एली स्कूलमधून तिला स्कॉलरशिप मिळाली आणि ती न्यूयॉर्कमध्ये ट्रेनिंगला गेली. न्यूयॉर्क फॅशन वीक दरम्यान तिने परफार्मेंस दिलं होतं. बॅक्सेंडेलला बिस्किट खाण्याची खूप आवड होती. ती नेहमीच चहासोबत बिस्टिक खात होती. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ती एका पार्टीत गेली. तिथे तिने काही बिस्किट म्हणजे कुकीज खाल्लेत. पण ते खाताच ती गंभीर आजारी झाली. 11 जानेवारीला तिचा मृत्यू झाला.
चौकशीतून समोर आलं कारण
बिस्किट खाल्ल्याने बॅक्सेंडेलचा मृत्यू झाला. हे समजल्यावर एकच गोंधळ झाला. चौकशी समिती नेमण्यात आली. तेव्हा जे समोर आलं ते हैराण करणारं होतं. जे सगळ्यांनाच माहीत असायला हवं. अटॉर्नी मारिजो एडिमी म्हणाले, बॅक्सेंडेलने जे बिस्किट खाल्ले होते, त्यात शेंगदाण्याचे तुकडे होते. बॅक्सेंडेलला शेंगदाण्यांची एलर्जी होती, यामुळे तिला गंभीर रिअॅक्शन झालं आणि ती कोमात गेली. मेडिकल भाषेत याला एनाफिलेक्टिक शॉक म्हणतात.
जेव्हा आपण एखाद्या खास गोष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा ती आपल्या शरीरात प्रवेश करते. तेव्हा घातक एलर्जी होते. शरीराची रक्षा करण्यासाठी इम्यून सिस्टीम अॅंटी-बॉडीज बनवू लागतं. हिस्टामिसारखे केमिकल रिलीज होतात. जे आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. बॅक्सेंडेलसोबतही हेच झालं.
बॅक्सेंडेल कदाचित आधीपासून माहीत नव्हतं की, तिला शेंगदाण्याची एलर्जी आहे. तसं असतं तर तिने बिस्किट खाल्ले नसते. दुसरं म्हणजे बिस्किट एका सुपरमार्केटमधून खरेदी करण्यात आले होते. ज्यावर स्पष्टपणे लिहिलं होतं की, यात शेंगदाणे आहेत. यामुळेही समस्या झाली. यानंतर प्रशासनाने स्टोरचा मालक आणि ठोक व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. देशभरातून असे सगळे बिस्किट परत मागे मागवण्यात आले. अटॉर्नी मारिजो एडिमी म्हणाले की, हा बेजबाबदारपणा आहे आणि हे सहन केलं जाऊ शकत नाही. विक्रेत्यांना यासाठी दोषी ठरवण्यात येईल.