एक काळ असा होता जेव्हा लोकांची नाती विश्वासावर चालत होती. कुणीही जास्त मेडिकल सायन्स किंवा विज्ञानावर विश्वास ठेवत नव्हते. पण सायन्ससोबत लोक इतके पुढे निघाले आहेत की, ते आधीच अशा गोष्टींची माहिती मिळवतात ज्यांचा कुणी विचारही केला नसेल. अशाच अविष्कारांपैकी एक म्हणजे डीएनए टेस्टची किट. जी परदेशात सहजपणे मिळते.
अलिकडे तुम्ही अशा अनेक घटनांबाबत ऐकलं असेल की, ज्यात एका डीएनए टेस्टमुळे अनेक वर्षांची लग्ने मोडली. कधी पत्नी बहीण असल्याचं समजतं तर कधी मुलाचा पिताच वेगळा निघतो. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात डीएनए टेस्टमुळे एक परिवार वेगळा होण्याच्या वाटेवर आहे. भलेही रिपोर्ट नॉर्मल आला असेल.
मिररच्या रिपोर्टनुसार, एका महिलेने रेडिटवर या घटनेचा खुलासा केला. तिने लिहिलं की, आपल्या आईच्या सांगण्यावरून पतीने डीएनए टेस्ट केली. तिच्या सासूला हे जाणून घ्यायचं होतं की, महिलेचे बाळ तिच्या पतीचेच आहेत की नाही. कारण बाळांचे चेहरे पतीसारखे दिसत नव्हते. अशात सासूला संशय होता की, मूल दुसऱ्याचं आहे. पतीने आईचं ऐकून डीएनए टेस्ट केली. टेस्टचा रिपोर्ट नॉर्मल आला आणि समजलं की, मुलं तिच्या पतीचेच आहेत. तरीही पत्नीने ठरवलं की, ती तिच्या पतीला घटस्फोट देणार.
पतीचं म्हणणं होतं की, असं करून त्याला त्याच्या आईचं तोंड बंद करायचं होतं. तर पत्नीचं म्हणणं होतं की, ती टेस्टबाबत जराही घाबरलेली नव्हती, पण तिला याचं वाईट वाटलं की, त्याने सासूच्या सांगण्यावरून तिच्यावर संशय केला.
आता दोघांचाही संसार मोडण्याच्या वाटेवर आहे. पत्नी राहण्यासाठी वेगळं घर बघत आहे तसेच वकिलाच्याही शोधात आहे. जेणेकरून घटस्फोट घेता येईल. महिलेचं मत आहे की, समस्या केवळ सासूच्या वागण्याची नाही तर पतीच्या गोष्टी हॅंडल करण्याच्या पद्धतीची आहे.