शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

बेडरुममधुन बाहेरही न पडता महिला झाली लखपती, महिन्याला कमवते तब्बल 'इतके' रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 6:50 PM

या व्यवसायातून तिनं एका महिन्यात चक्क ३८ लाख रुपये कमावले, तेही खोलीच्या बाहेर न पडता. आश्चर्य वाटलं ना? पण हे सत्य आहे. कोण आहे ही महिला आणि तिनं का आणि कोणता व्यवसाय केला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या.

जास्त पैसे कमवण्यासाठी अनेक जण नोकरीपेक्षा व्यवसाय (Business Idea) करण्याला पसंती देतात. अनेकांना व्यवसाय करण्याचीच आवड असते. काही वेळा परिस्थितीमुळे अनेक जण उपजीविकेचे साधन म्हणून छोटा मोठा व्यवसाय करतात. आपल्याकडे घर सांभाळून काही अर्थार्जन करण्यासाठी घरबसल्या अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या महिला आपण पाहतो. ब्रिटनमधल्या एका महिलेनं मात्र व्यवसाय सुरू करण्यामागे एक अजबच कारण घडलं; मात्र त्यातून तिच्यातल्या एका नव्या क्षमतेची ओळख तिला पटली आणि या व्यवसायातून तिनं एका महिन्यात चक्क ३८ लाख रुपये कमावले, तेही खोलीच्या बाहेर न पडता. आश्चर्य वाटलं ना? पण हे सत्य आहे. कोण आहे ही महिला आणि तिनं का आणि कोणता व्यवसाय केला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या.

ही गोष्ट आहे ब्रिटनच्या वेल्समध्ये राहणाऱ्या मायकेला मॉर्गनची (Michaela Morgan). मायकेला आता एक प्रतिष्ठित डिजिटल डिजिटल आर्टिस्ट (Digital Artist) म्हणून नावारूपाला आली आहे; मात्र एक वेळ अशी होती जेव्हा ती पूर्णपणे मोडून पडली होती. दुःखाने खचून गेली होती. मायकेला पतीपासून विभक्त झाल्यामुळे पूर्णपणे खचून गेली होती. त्यातच तिचा आधार असणारा लाडका कुत्राही काळाने हिरावून घेतल्यानं ती दुःखाने अगदी वेडीपिशी झाली होती. एकामागे एक घडलेल्या या घटनांनी तिला हादरवून टाकलं होतं; मात्र या काळातच तिनं कम्प्युटरवर चित्रं (Paintings on Computer) काढायला सुरुवात केली आणि पुढे हाच तिचा व्यवसाय बनला. आज ती यशस्वी व्यावसायिक बनली असून, दरमहा जवळपास ४० लाख रुपये कमावते. nypost.com ने याविषयी वृत्त दिले आहे.

हा बदल कसा झाला याबाबत 'वेल्स ऑनलाइन'शी बोलताना मायकेला म्हणाली, '२०१९ मध्ये मी माझ्या पतीपासून विभक्त (Divorce) झाले. त्यानंतर दोनच आठवड्यांच्या आत, कॅन्सरशी लढा देत असलेल्या माझ्या लाडक्या कुत्र्याचाही मृत्यू झाला. यामुळे मी अगदी हादरून गेले होते. मला काहीही करावंसं वाटत नव्हतं. खूप भयंकर काळ होता तो. मी घरातून बाहेर पडणं, लोकांना भेटणं बंद करून टाकलं होतं. तब्बल तीन आठवडे मी अंथरुणातच घालवले; पण मला असं काही तरी करायचं होतं ज्यामुळे मला स्वत:लाच स्वत:चा अभिमान वाटेल. अखेर मी स्वत:ला सावरलं आणि व्यवसाय, स्वयंपूर्णता, डिजिटल आर्ट आदी गोष्टींबाबत वाचायला सुरुवात केली. लहानपणापसून मला याची आवड होती. यातूनच मी कम्प्युटरवर कलाकृती बनवण्यास सुरुवात केली. पेंटिंग्ज करायला सुरुवात केली. कम्प्युटरवरच्या या चित्रांची प्रिंट काढणं खूप अवघड असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळं डिजिटल आर्टिस्ट म्हणून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यासाठीही आयपॅड प्रोसारख्या उपकरणांकरिता मोठ्या गुंतवणुकीची गरज होती; मात्र या दिशेनेच पुढं पाऊल टाकायचं ठरवलं. कोरोना साथीचा काळ (Coronavirus Pandemic) सुरू असल्यानं घरी बसून काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आपल्या बेडरूममध्ये बसूनच मी हा व्यवसाय सुरू केला आणि मला त्यात उत्तम यशही मिळालं. माझ्या कलाकृतींना चांगली किंमत मिळाली.

गेल्या वर्षी एप्रिलच्या अखेरीपासून यंदाच्या जुलैअखेरीपर्यंत मायकेला मॉर्गनने मिमो आर्ट्सच्या (Mimo Arts) माध्यमातून तिची एक कोटीहून अधिक मूल्याची चित्रं विकली आहेत. ही सर्व चित्रं तिनं आपल्या बेडरूममध्ये बसल्या बसल्या तयार केली होती. आता अनेक नामांकित कंपन्यांबरोबर, ब्रँड्सबरोबर ती काम करत आहे.

मायकेला म्हणते, 'प्रामाणिकपणे सांगायचं, तर मी आतापर्यंत केलेल्या सर्वांत भयानक गोष्टींपैकी ही एक गोष्ट होती. परंतु आत्मविश्वास ठेवावा लागतो. गेल्या वर्षीपर्यंत मला डिजिटल आर्टविषयी काहीही माहित नव्हतं; मात्र आता मी मागे वळून पाहते तेव्हा मला असं वाटतं, की दहा वर्षांपूर्वीच मी हा व्यवसाय सुरू करू शकले असते.' मायकेला आता स्वत:वर खूप खूश असून, आपल्या कलाकृतींचा आनंद घेत आहे. आणखी मेहनत घेऊन आणखी प्रगती करण्यासाठी ती सज्ज आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके