लोकांना एखादी विकत घेतलेली वस्तू किंवा कोणतीही गोष्ट पैसे वसूल होईपर्यंत वापरण्याची सवय असते. एका महिलेने आपला हा नियम अगदी खाण्याच्या बाबतीतही लागू केला (Woman eat lost of food at buffet restaurant). एका बुफे रेस्टॉरंटमध्ये ती गेली. जिथं सुरुवातीला एकदाच पैसे द्यायचे असतात आणि हवं तितकं मनसोक्त पोट भरून खायला मिळतं. या महिलेने आपण जितके पैसे दिले तितके पैसे वसूल करण्याच्या नादात इतकं खाल्लं की तिची अवस्था भयंकर झाली.
अमेरिकेतील २४ वर्षांची डॅनियल शाप्रियो (Danielle Shapiro) कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू रेस्टॉरंट सुशी 85 मध्ये ती गेली (Woman eat 32 sushi). तिथं बुफेसाठी एका व्यक्तीला ५० डॉलर्स म्हणजे जवळपास ३ हजार ७०० रुपये होते. डॅनिअलने पैसे दिले आणि तिने ती वसूल करण्याचीही तयारी केली. पाहतात पाहता तिने ३२ सुशी रोल, ४ डम्पलिंग, २ वाटी सोयाबीन, २ जॅलेपिनो पॉपर्स आणि एक वाटी मिसो सूप प्यायली. ही यादी वाचूनच आपल्याला चक्कर आली विचार करा डॅनिअलची काय अवस्था झाली असेल. डॅनिअलच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. तिची अवस्था खूपच भय़ंकर झाली. अखेर तिला रुग्णालयातच दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी तिला गॅस आणि अॅसिडीटी झाल्याचं सांगितलं.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही घटना २१ डिसेंबर, २०२१ ची आहे. डॅनिअलने स्वतः आपला हा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. तिने टिकटॉवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने सांगितलं, तिची बेस्ट फ्रेंड अमांडासोबत ती सुशी खायला गेली होती. दोघींनी ३ हजार ७०० रुपये वसूल करण्याच्या नादात तब्बल २ तास खाल्लं.
आता खाल्ल्यानंतर इतका त्रास झाला तरी डॅनिअलचं सुशी प्रेम काही कमी झालं नाही. आपण आपला आवडता पदार्थ खातच राहणार असं तिने सांगितलं. पण आपण हे कमी प्रमाणात खाऊ असंही ती म्हणाली.