Woman eats Cement Bricks: हल्लीचं जग विविधतांनी नटलेलं आहे. संपूर्ण जगभरात कोण कधी काय करेल याचा काहीच अंदाज लावता येणं शक्य नसते. एखादी गोष्ट वारंवार केल्यावर त्याची सवय करून घेणे हा मानवाचा स्वभाव आहे. जगभरातील लोक वेगवेगळ्या सवयी बनवतात. त्या कधीकधी व्यसनात बदलतात. कधी हे व्यसन काही आरोग्यदायी खाण्याचे असते, तर कधी शरीराला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचे असते. पण माती आणि सिमेंट खाण्याचे व्यसन लागल्याचे तुम्ही ऐकले आहेत का... ही गोष्ट तशी फार कठीण आहे पण असा प्रकार इंग्लंडमधील एका ३९ वर्षीय महिलेसोबत घडला आहे. एखाद्या लहान मुलाने चॉकलेट किंवा बिस्कीटं खावी, इतक्या सहजतेने ती महिला सिमेंट-माती आणि प्लॅस्टरचे गोळे खाते. तिच्या या सवयीने पतीलाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
कोण आहे ही महिला?
३९ वर्षीय या महिलेचे नाव आहे, पेट्रिस बेंजामिन रामगुलाम. (patrice benjamin-ramgoolam) या महिलेला वाळू, वीट आणि सिमेंट खाण्याचे व्यसन लागले आहे. विशेष म्हणजे, या सर्व गोष्ट खाताना तिला खूप टेस्टी लागतात, असेही ती सांगते. वयाच्या १८ व्या वर्षी कानात वाळू, सिमेंट आणि विटांचे तुकडे टाकण्याची तिला सवय त्याला लागली होती. काहींना गोड पदार्थ आवडतात, तर काहींना मसालेदार पदार्थ आवडतात. पण पेट्रीसला मात्र वाळू, वीट आणि मोर्टारची चव आवडते. एका रिपोर्टनुसार, ती घराच्या भिंतीकडे टक लावून पाहत राहते आणि भिंतींच्या आतील गोष्टी खाण्यासाठी काही वेळा चक्क प्लॅस्टर तोडते.
पतीची प्रतिक्रिया काय?
जेव्हा पेट्रीसच्या पतीला या व्यसनाबद्दल कळले तेव्हा त्याने पेट्रिसला ही सवय सोडण्याची विनंती केली. मात्र, पेट्रीस ही सवय सोडू शकलेली नाही. तिच्या मते वीट, सिमेंट आणि प्लॅस्टरचे तुकडे खाल्ल्याने तिला आनंदी राहण्यास मदत होते. हे व्यसन इतके तीव्र आहे की ती तिची प्रकृती हळूहळू बिघडवत आहे हे माहीत असूनही ती या गोष्टी सोडू शकत नाही, असेही अहवालात म्हटले आहे.