कोरोनाच्या माहामारी माणुसकीचा अर्थ अनेकाना पुन्हा नव्याने समजला. कोरोना काळात समाजातील काही घटक गोरगरीबांसाठी देवदुताप्रमाणे कार्य करत होते. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या महिलेने दाखवलेल्या माणुसकीबाबत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ दक्षिण भारतातील केरळमधील आहे.
तुम्ही या व्हिडीयोमध्ये पाहू शकता की एका वयस्कर माणसाला बस पकडायची होती. त्याचवेळी एक अनोळखी महिला त्या ठिकाणी आली आणि तिने या आजोबांचा हात पकडून त्यांना बसपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. या अंध आजोबांना बसमध्ये चढवल्यानंतर ही महिला तीच्या कामासाठी पुढे जाते.हा व्हिडीओ पाहून अनेकांचे मन भरून आले आहे.
या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या महिलेसारख्या लोकांची समाजाला गरज असल्याचे म्हटले आहे. आयएफअस अधिकारी विजय कुमार यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे जग चांगल्या लोकांनी भरलेले आहे. असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीयोला आत्तापर्यंत ४ लाख ४३ हजार व्हिव्हज मिळाले आहेत.
विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या महिलेने मास्कचा वापर करत नियमांचे पालन केले आहे. सोशल मीडियावर या महिलेच्या कामाचे लोक खूप कौतुक करत आहेत. समाजात आणि समाजासाठी जगत असताना प्रत्येकाने असा आदर्श घ्यायला हवा.
शाब्बास! पोरानं कचऱ्यापासून बनवले ६०० ड्रोन; थेट DRDO नं दिली नोकरी? वाचा फॅक्ट्स
'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या