लठ्ठपणा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. वजन वाढत असताना शरीरातील आतील काही भागांनाही नुकसान पोहोचत असतं. त्यामुळे नेहमी फीट राहाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फीट राहण्याचा अर्थ नेहमीत जिमिंग, वेट लिफ्टिंग (Weight Lifting) करून बॉडी बनवणं नसतो. अनेकदा वय आणि उंचीनुसार आपलं वजन बॅलन्स असणं आरोग्यासाठी फायद्याचं (Health Tips) असतं. मात्र, हेदेखील आपण करू शकलो नाही तर विविध आजारांना आमंत्रण मिळतं.
ब्रेडन इंग्लंडमधील जेस गोल्डचाही अशाच लोकांमध्ये समावेश आहे, ज्यांचं आयुष्य अतिवजनामुळे वेगळ्याच वळणार पोहोचलं. शरीरात विविध समस्या निर्माण होऊ लागल्या. इतकंच नाही तर हालचाल करणंही कठीण होऊन गेलं. अशा परिस्थितीत स्वतःच आयुष्यच एक ओझं असल्यासारखं वाटू लागलं. यामुळे अखेर जेसने स्वतःला पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला. तिने यासाठी भरपूर मेहनत घेतली आणि वजन कमी केलंच (Weight Loss Effect on Body).
वजन कमी झाल्यानंतर आता मात्र शरीरावर लटकलेली जवळपास ६-७ किलोची लूज स्किन आता तिच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण चालताना-फिरताना आणि बसतानाही ही एक्स्ट्रा स्किन महिलेचा बॅलन्स बिघडवते. तिला स्वतःला सांभाळणं शक्य होत नाही. वेदना तर वेगळ्याच. अशात आता ती ही एक्स्ट्रा स्कीन काढून टाकण्यासाठी सर्जरी करायची असून यासाठी तिला फंडिंग हवं आहे. या ऑपरेशनसाठी ३१ लाख ३४ हजार ६२३ रुपये इतका खर्च येणार आहे. तिचं म्हणणं आहे, की शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तिला पैशांची गरज आहे, यासाठी ती GoFundMe page पेजवर डोनेशनची मागणी करत आहे.
जेसला अखेर तेव्हा असं वाटलं की आपण वजन कमी करायला हवं, जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ती फायब्रोमायल्जियाने पीडित आहे. पायांवर चालण्यासाठीही सक्षम नाही. अतिवजनामुळे तिचं फुफ्फुसही क्रॅश होण्याच्या मार्गावर होतं. यामुळे जेसने केवळ डायट, व्यायाम आणि हेल्दी फूड खाऊन आपलं वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि ते करूनही दाखवलं. जेसला जंक फूड, कोल्ड्रिंक्स आणि हेवी कॅलरी फूड खाण्याची सवय खूप जास्त होती. त्यामुळे ती दिवसभर पिझ्झा, बर्गर, फॅट कोकसारखे पदार्थ खाऊन पिऊन बेडवर पडून राहात असे. यामुळे तिचं वजन वाढतच गेलं. वाढत्या वजनामुळे तिला उठता बसतानाही त्रास होत होता. मात्र अखेर तिने ते करून दाखवलं, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती.