जेव्हा एखाद्या गोष्टीची सवय लागते आणि ती सीमा पार करते तेव्हा माणसाला स्वत:चं चांगलं-वाईट काहीच दिसत नाही. स्पेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला सुद्धा अशीच लत होती. ही लत होती जुगार खेळण्याची, लॉटरी लावण्याची. महिलेला बिंगो कार्ड्स खेळण्याची इतकी लत लागली होती की, तिने पैशांसाठी स्वत:च्या किडनॅपिंगचं नाटक रचलं.
हे नाटकही या महिलेने तेव्हा रचलं जेव्हा तिचा पती हॉस्पिटलमध्ये भरती होता. तो घरी नसल्याने त्याला त्याच्या पत्नीच्या प्लॅनबाबत काहीच समजलं नाही. तेव्हाच पत्नीने तिच्या खोट्या किडनॅपिंगबाबत पतीला मेसेज करून सांगितलं. आणि पत्नीला सोडवण्यासाठी ५ लाख रूपयांची मागणी केली. साध्या-भोळ्या पतीने खरंच असं काही घडलं की नाही हे न तपासून पाहता 'किडनॅपर' ला पाच लाख रूपये दिले सुद्धा.
४७ वर्षीय पत्नीने जबरदस्त ड्रामा रचला होता. तिने अपहरणाचा ड्रामा करण्यासाठी पतीला फोन करून सांगितलं की, तिला काही लोकांनी उचलून नेलं आणि मला सोडण्यासाठी ते ५ लाख रूपयांची मागणी करत आहेत. पैसे मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेला खंडणीचे पैसे चोरून बिंगो कार्ड घेऊन बिंगो हॉलमध्ये शिरताना पाहिलं. महिला बाडालोना कसीनोमध्ये होती. तेव्हा पोलिसांनी तिला अटक केली.
कशी झाली पोलखोल?
महिलेच्या पतीने 'किडनॅपर'ला पैसे तर दिले, पण सोबतच पोलिसांनाही या किडमॅपिंगची माहिती दिली. पोलिसांनी तो नंबर ट्रॅक केला ज्यावरून पत्नीने पतीला मेसेज पाठवले होते. पोलिसांना जेव्हा काही शंका आल्या तेव्हा त्यांनी महिलेच्या हालचालीवर लक्ष ठेवलं. त्यानंतर पूर्ण घटना समोर आली. सध्या महिलेला जामिनावर सोडण्यात आलं आहे. पण केस सुरूच राहील.