जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, ज्यांच्या आवडी-निवडीही वेगळ्या असतात. काहींना भौतिक गोष्टी आवडतात तर काहींना मानवी भावना आवडतात. काहींना एखाद्या व्यक्तीचं बाह्य रूप आवडतं, तर काहींना एखाद्याचं खरं मन आवडतं. मात्र एका हंगेरियन महिलेला (Woman Loves toy Plane) माणसावर नव्हे तर खेळण्यावर प्रेम झालं आहे. विशेष म्हणजे हे प्रेम खेळण्यांवर सहसा माणसाचं असतं तसं नाही, तर एखादा व्यक्ती समोरच्याच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तसं आहे.
बुडापेस्ट येथे राहणारी २८ वर्षीय सँड्रा एका खेळण्यातील प्लेनच्या प्रेमात पडली आहे (Relationship with Plane). या विमानाला ती प्रेमाने Luffancs म्हणते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेने यावर्षी जानेवारीमध्ये 60 हजार रुपयांचं एक खेळणं विकत घेतलं होतं आणि ती त्याच्या प्रेमात पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला लहानपणापासूनच खेळण्यातील विमानांचं वेड होतं. ती ३ वर्षांची असतानाही अनेक विमानं खरेदी करायची.
मिळालेल्या माहितीनुसार, सँड्रा विमानाला तिच्या बेडवर घेऊन झोपते आणि सकाळ संध्याकाळ त्याला किस करत राहाते. विमानावरील प्रेमामुळे सँड्राने २०२१ मध्ये विमान वाहतूक उद्योगात नोकरी शोधली होती. आता ती तिच्या आवडत्या विमानांसोबत आणखी जास्त वेळ घालवते. सँड्राच्या आधीच्या बॉयफ्रेंडने तिच्या विमानावरील प्रेमावर कधीच आक्षेप घेतला नाही. परंतु गेल्या वर्षी तिचं ब्रेकअप झाल्यानंतर तिने माणसाशी नाही तर खेळण्यातील विमानाशी रिलेशनशिपमध्ये राहाण्याचा निर्णय घेतला.
जॅम प्रेसशी बोलताना ती म्हणाली की तिचं लूफँक्सवर इतकं प्रेम का आहे हे तिला माहिती नाही पण ती त्याच्यावर खूप प्रेम करते. ती म्हणाला की हे विमान अतिशय सुंदर आहे आणि तिचा सोलमेट आहे. तिने सांगितलं की, सकाळी उठल्यावर ती सर्वात आधी तिच्या विमानाकडे पाहते आणि झोपायला गेल्यावरही शेवटी त्यालाच पाहून झोपते. सँड्रानं असंही प्रांजळपणे सांगितलं की ती या विमानासोबत रोमान्सदेखील करते (Romance with Toy Plane) आणि त्याच्यासोबत खूप जिव्हाळ्याचे क्षण देखील शेअर करते.