सामान्यपणे लोकांसाठी सर्वात सुरक्षित जागा ही त्यांचं घर असतं. घरात असले की त्यांना कोणताही धोका जाणवत नाही. पण याच घरात काही अशा गोष्टी घडतात की, विश्वास बसत नाही. आता हीच घटना बघा ना. यूकेतील साउथपोर्टमध्ये राहणाऱ्या एका परिवाराला अंदाजही नव्हता की, त्यांच्या घरात एक नको असलेला पाहुणा येऊन बसलाय. हा पाहुणा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये लपून बसला होता. झालं असं की, महिलेने भिजलेले कपडे सुकवण्यासाठी मशीनचं ड्रायर उघडलं. त्यात तिला जे दिसलं बघून ती जोरात ओरडली.
परिवारातील महिलेने कपडे सुकवण्यासाठी मशीनच्या ड्रायरचा वापर केला.. जसं तिने ड्रायर उघडलं, तिला आत बसलेला मोठा अजगर दिसला. इतका मोठा साप आपल्या घरात बघून घाबरून महिला जोरात ओरडली. ती लगेच धावत बाहेर गेली. काय झालं हे बघायला घरातील सगळे सदस्य आले. त्यांनी लगेच अॅनीमल रेक्स्यू सेंटरला फोन केला आणि मदतीची मागणी केली.
यूके एक्सोटिक अॅनिमल चॅरिटीचे सीनिअर मॅनेजर माइक पॉट्स म्हणाले की, हा अजगर पाळीव आहे. एकतर तो पळून आला आहे नाही तर त्याला त्याच्या मालकाने काढून दिलं असेल. तशी अजून कुणीही आपला पाळीव अजगर मिसिंग झाल्याची तक्रार दिलेली नाही. त्यामुळे त्याच्या मालकाची माहिती मिळू शकली नाही. टीम त्याच्या मालकाचा शोध घेत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.